‘आकस्मिक निधी’ हाताशी हवाच!

Reading Time: 3 minutes दीर्घकालीन गुंतवणुकींसाठी आपण जेवढा विचार करतो तेवढाच विचार आपण नजीकच्या भविष्याचा आणि त्यात उद्भवू शकणाऱ्या अनिश्चिततेचा केला पाहिजे. ज्यासाठी नियोजन शक्य आहे अशा नवीन घर, गाडी, परदेशभ्रमण इत्यादी गोष्टींसाठी २-३ वर्षं किंवा त्याही आधीपासून तयारी केली पाहिजे. त्याचबरोबर अनपेक्षित, आकस्मित खर्च काय उद्भवू शकतात त्यांच्या विचार करून त्यासाठी तजवीज करून ठेवणे गरजेचं आहे. अपघात, आजारपणं, सक्तीची सेवानिवृत्ती अशी संकटं कुठलीही पूर्वकल्पना न देता आपल्या समोर दत्त म्हणून उभी ठाकू शकतात. त्यातल्या काहींसाठी आपण विमासंरक्षण घेतलेले असले तरीही एक वेगळा समर्पित निधी त्यासाठी तयार केलेला असला पाहिजे.