थेट इक्विटी की म्युच्युअल फंड?

Reading Time: 3 minutes आम्हाला अनेक लोक विचारत असतात शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे, कुठले शेअर्स घेऊ? अनेकदा कोणाच्या तरी सल्ल्याने सुरुवात केलेली असते. बाजारात तेजी असते, सगळेच शेअर्स वर जात असतात तेव्हा हे लोक खुश असतात. पण आपल्याला झालेल्या फायद्यात स्वतःच्या कौशल्याचा भाग किती आणि निव्वळ नशिबाचा भाग किती याचा बहुतेकांनी विचार केलेला नसतो.

इक्विटी मार्केट पडझड – हा काळही सरेल

Reading Time: 3 minutes जेव्हा सर्व काही आलबेल असते तेव्हा बरेच लोक हे विसरून जातात की शेअर बाजारात मुदत ठेवींप्रमाणे स्थिर दराने परतावा मिळणार नसतो, तर अनेक महिने, काही वेळा वर्षे  गुंतवणूक नुकसानीत दिसत राहू शकते. मात्र चांगले दिवस आले की थोड्याच अवधीत अशी गुंतवणूक नुकसानच भरून काढते असे नव्हे, तर वर नफाही करून देते. ‘गुंतवणूक’ हे मानवी मनातील भविष्याविषयी वाटणाऱ्या ‘आशा’ आणि ‘अनिश्चितता’ या दोन भावनांमधील द्वंद्व आहे

शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

Reading Time: 4 minutes शेअर बाजार म्हटलं की जोखीम आली. पण बहुतेक सामान्य गुंतवणूकदार केवळ ‘सुखाचे सोबती’ असल्याप्रमाणे वागतात. सुखाच्या काळात, म्हणजेच बाजार वरवर जात असताना, गुंतवणूकदारांच्या तोंडी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असे शब्द असतात. पण दुःखाच्या काळात, म्हणजेच बाजारातील पडझडीच्या काळात, तेच ‘हम आपके है कौन?’ असं विचारायला लागतात. अशा चढउतारांना एक समस्या म्हणून नव्हे तर शेअर बाजाराचा गुणधर्म म्हणून स्वीकारले पाहिजे. हीच मार्केट मधील रिस्क किंवा जोखीम आहे आणि तिला तोंड देण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे असते.