शेअर बाजार: ये रिस्क, रिस्क है रिस्क, रिस्क!

Reading Time: 3 minutes शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जास्तीची जोखीम. ही थिअरी आजकाल सर्वांना तोंडपाठ असते. मात्र बहुसंख्य गुंतवणूकदारांमध्ये ही जोखीम उचलायची तयारी फक्त बाजार वर जातानाच असते. बाजारात पडझड सुरु झाली की या लोकांची चुळबुळ सुरु होते. मार्केट पुन्हा कधी वर जाणार, पुन्हा जागतिक मंदी येणार का? अमक्या चॅनेल वर पुढील दोन वर्षे खराब जातील सांगितलं मग गुंतवणूक थांबवूया का? अशा विचारणा सुरु होतात. 

शेअरबाजारः DHFL चे महाभारत

Reading Time: 4 minutes गेल्या आठवड्यात म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुकदारांना मोठाच धक्का बसला. आपल्या गुंतवणुकीचे मुल्य फक्त एका दिवसांत (०४ जुन २०१९) जेव्हा १०.. २०.. ३०%  आणि (काही दुर्दैवी लोकांनी) ५०% पेक्षा अधिक गमावल्याचे अनेकांना आढळले. आश्चर्याची बाब म्हणजे नुकसानीची ही त्सुनामी शेअर् बाजारांत थेट पैसे गुंतविणाऱ्या ‘ईक्विटी फंड्स’मध्ये नव्हती, तर एरवी सुरक्षित, बॅंकेच्या मुदतठेवी समकक्ष असल्याचे ‘भासवुन विकल्या गेलेल्या ‘गैर ईक्विटी’ योजनांमधे  होती. एका दिवसात झालेल्या नुकसानीची टक्केवारी दाखवणारी खालील आकडेवारी हे चित्र किती विदारक आहे हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.