TDS: टीडीएस प्रणाली आणि बँक ठेवींवरील व्याजाचं गणित

Reading Time: 3 minutes बँक किंवा कोणतीही संस्था/ कंपनी/ कारखाना/ कार्यालय/ रुग्णालय/दुकान अशा उत्पन्न देणाऱ्या घटकाला TDS प्रणालीनुसार ठरलेल्या प्रकारे कर कापून घेणे आणि तो आयकर खात्यात जमा करणे पूर्णपणे बंधनकारक आहे. उत्पन्न किती दिले, त्या व्यक्ती/ संस्थेचा पॅन कार्ड वगैरे सर्व तपशील, कर किती कापून घेतला? अशा सर्व तपाशीलांची नोंद नियमितपणे ठेवावी लागते. ते सर्व तपशील देऊन तो नियमाप्रमाणे असलेला कर आयकर खात्याकडे जमा करायचा असतो. ते न केल्यास दंड आकाराला जातो.