Digital Lending: तुम्ही डिजिटल सावकाराच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?
Reading Time: 3 minutesकर्ज देणारा आधुनिक प्रकार म्हणजे डिजिटल सावकार (Digital Lending). “इन्स्टंट लोन घ्या”, “२ मिनिटांत पैसे तुमच्या खात्यात जमा” असा मेसेज जवळपास सर्वांनाच येत असेल. ‘कर्ज काढणे’ ही कोणत्याच व्यक्तीची हौस नसते, तर ती गरज असते. कोणत्या तरी आर्थिक विवंचनेत अडकलेली व्यक्ती ज्याचं निराकरण निकटवर्तीयांपेक्षा आर्थिक संस्थेकडूनकरून घेण्याचा विचार करते आणि जेव्हा सर्व पर्यायांचा विचार करूनही जर त्या व्यक्तीला योग्य मार्ग सापडत नसेल, तर ती व्यक्ती मोबाईलमध्ये आलेले मेसेजेस तपासून एखाद्या लिंकवर ‘क्लिक’ करते. ही लिंक असते ‘डिजिटल सावकाराची !