DigiLocker: तुम्हाला डिजीलॉकर बद्दल माहिती आहे का?

Reading Time: 5 minutes डिजीलॉकर (DigiLocker) म्हणजे डिजिटल लॉकर. बँकेतील लॉकरमध्ये ज्याप्रमाणे आपण मौल्यवान वस्तू महत्वाचे कागदपत्र सुरक्षित ठेवतो, त्याचप्रमाणें या आधुनिक तिजोरीत, सरकारी विभाग आणि सरकारने मान्यता दिलेले आपले अधिकृत महत्वाचे दस्तावेज तसेच आपल्याला महत्वाची वाटत असणारी अन्य कागदपत्रे, प्रमाणपत्रे, ओळखपत्रे डिजिटल स्वरूपात साठवून ठेवता येतात. आवश्यकता पडल्यास यातील अधिकृत कागदपत्र मूळ कागदपत्रांसारखी वापरता येतात. अन्य व्यक्ती/ संस्था यांना संदर्भ म्हणून देता येतात.