पेन्शनचं टेन्शन!

Reading Time: 4 minutesगेल्या काही वर्षात भारताच्या सेवाक्षेत्रातील प्रगतीमुळे तिथले आर्थिक लाभ वाढले आणि सरकारी नोकरीचे महत्त्व काहीसे कमी झाले. मात्र रिटायरमेंट प्लानिंग म्हटलं की लोकांना अजूनही खात्रीशीर, वाढत जाणारं आणि गरजांना पुरून उरणारं ‘सरकारी पेन्शन’ हीच गोष्ट डोळ्यासमोर येते. बदलत्या काळामुळे अशा खात्रीशीर पेन्शनच्या स्वरूपात पडलेला बदल बहुतेकांच्या लक्षात येत नाही आणि मग ते एलआयसी (LIC) किंवा तत्सम कंपनीचा कुठलातरी ‘पेन्शन प्लान’ गळ्यात बांधून घेतात.

आर्थिक नियोजनाचे महत्व : आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

Reading Time: 3 minutesतुमच्या स्वतःचा पगार आणि इतर उत्पन्नाचे आर्थिक नियोजन तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. गरज वाटल्यास त्याचा एक लिखित आराखडा तुमच्या जवळ असेल तर उत्तमच. पण निदान तुम्ही कुठे खर्च करू इच्छिता? येत्या काळात कोणते संभाव्य खर्च आहेत? कोणती संभाव्य आवक आहे? अडचणीच्या काळी कुठून खर्च करणार? कर्ज घेणार का? किती घेणार? निवृत्तीनंतर काय? अशा प्रश्नाची उत्तरे खूप सुरवातीपासून तपासत राहावी म्हणजे आपल्याबरोबरच आपल्या परिवाराच्या आनंदाची हमी आपण देऊ शकतो.