नोकरी जाईल याची सारखी भीती वाटते? मग हे वाचा…
Reading Time: 3 minutesसध्या एकूणच आर्थिक, औद्योगिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेतला तर, आहे ती नोकरी टिकेलच याची शाश्वती फारशी राहिलेली नाही. जागतिक मंदीने भारतालाच नाही तर, जगाला वेढलेलं आहे. अशात हवं तेवढं उत्पादन करण्याची क्षमता घटलेली आहे, त्यामुळे कामगार किंवा कर्मचा-यांची गरज आणि मागणी कमी झालेली आहे. नोकरी कशी आहे, कुठे आहे, यापेक्षाही नोकरीच्या संधी किती आहेत, याला जास्त महत्त्व आलं आहे. अशात आपली चालू नोकरी, ज्यावर आपली उपजिविका चालते, ती गमावून बसतो की काय? या मानसिक तणावामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे.