Reading Time: 2 minutes

पैसा आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी एकमेकांवर काही प्रमाणात अवलंबून आहेत. साधारणतः जर पैसा आणि व्यायाम यापैकी कुठलीही एक गोष्ट निवडण्याचा विकल्प दिल्यास कुणीही पैसा निवडेल, कारण भौतिक गरजा पैशाशिवाय पूर्ण करणे अश्यक्य आहे. असे असले तरी  येल (Yale) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ मधील अहवालांमधून एक वेगळा निष्कर्ष समोर आला आहे. या अहवालनुसार पैशाच्या तुलनेत व्यायामामुळे माणूस जास्त आनंदी राहतो, आहे ना आश्चर्यकारक? शास्त्रज्ञांच्या मते, वर्षाला सुमारे १७,५०,००० रुपये कमावणाऱ्या व्यक्तीपेक्षा नियमित व्यायाम करणारी व्यक्ती जास्त आनंदी असते. 

तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

 • निश्चितच पैसा आणि व्यायाम ह्या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. नियमित व्यायाम तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशिर ठरतं उदा. नियमित व्यायामाने तुमची “संज्ञानात्मक कामगिरी” म्हणजेच “Cognitive Performance” विकसित होते. 
 • एकाग्रता, स्मरणशक्ती या सगळ्या गोष्टींवर नियमित व्यायाम करणं उपयुक्त ठरतं. उत्तम मासिक आणि शारीरिक स्थिरता तुम्हाला कमीत कमी वेळात अधिकाधिक काम करण्यास मदत करते आणि या सर्वांचा पैशांशी अप्रत्यक्ष संबंध आहे. कसे ते बघू.

१. वैद्यकीय खर्च बचत-

 • नियमित आहार अथवा व्यायाम हे अनेक रोग व त्यापाठोपाठ येणारे खर्च यांची बचत करण्यास मदत करते. 
 • मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग तसेच चिंता आणि नैराश्य या सर्व रोगांवर व्यायाम हा रामबाण इलाज आहे.  
 • नियमित व्यायाम किंवा व्यायाम केल्यानं या सर्व रोगांवर होणारा खर्च टाळल्या किंवा कमी केल्या जाऊ शकतो.

अर्थसाक्षर कथा – संपत्ती आणि नातेसंबंध

२. वाहतूक खर्चात बचत

 • रोज लागणाऱ्या सामानाची खरेदी करतांना किंवा जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांपेक्षा पायी अथवा सायकल हा पर्याय निवडल्यास इंधनावर होणारा खर्चही वाचेल शिवाय हृदयाचा उत्तम व्यायाम म्हणजेच cardio exercise सुद्धा होईल.

३. कार्यालयीन कामात उत्पादकता  

 • संज्ञानात्मक कामगिरी” म्हणजेच (Cognitive Performance) वाढल्यामुळे आपल्याला रोजच्या कार्यालयीन कामात उत्पादकता वाढल्याचे आढळून येते. 
 • उदा. एखादे काम करायला जर तुम्हाला एक तास लागत असेल तर ते अवघ्या अर्ध्या तासात होताना दिसेल. परिणामी तुम्हा आणखी जास्त काम करू शकाल आणि साहजिकच याचा फरक तुमच्या उत्पन्नावर होतांना दिसेल. 

पैसा आणि आरोग्याचा एकमेकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असला, तरी उत्तम आरोग्य ठेवायला पैसा लागतोच असं नाही. लोकांचा गैरसमज आहे की चांगलं आरोग्य ठेवणे म्हणजे महागडे जिम किंवा स्पोर्ट्स क्लबची मेंबर्शिप घेणे मात्र तसे मुळीच नाही. कुठलाच खर्च न करता सुद्धा आपण आरोग्य राखू शकतो. पहाटे बागेत मारलेली दौड, रात्री जेवण झाल्यावर केलेली शतपावली हे सुद्धा एक प्रकारे कर्डियोच आहे. लहान लहान सवयी मोठे बदल घडवून आणतात.  

पैशावरून तुमची जोडीदाराबरोबर भांडणे होतात का?

 • सुरवातीला नमूद केलेला येल आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातील अहवाल “द लान्सेन्ट”मध्ये  (The Lancet) प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात अशी माहिती दिली होती की संशोधकांनी ठराविक अमेरिकन लोकांचा डेटा गोळा केला होता. यात त्यांची शारीरिक व मानसिक वागणूक लक्षात घेतल्या गेली होती. 
 • या संशोधनात सहभागी असलेल्या लोकांना एकच प्रश्न विचारण्यात आला “गेल्या ३० दिवसांमध्ये तुम्हाला किती वेळा मानसिक तणाव किंवा अस्थिरता जाणवली?” उदा. मानसिक ताण, नैराश्य. 
 • या संशोधनाचा निर्णय आश्चर्यकारक होता. जे लोक नियमित व्यायाम करत होते ते लोक भरपूर पैसा कमावणाऱ्या लोकांच्या तुलनेत अधिक आनंदी होते. 

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

“आरोग्यम् धनसंपदा!” नियमित व्यायाम करणे या सारखी दुसरी भेट आपण स्वतःला देऊ शकत नाही.  व्यायाम व पैसा याचा परस्पर संबंध कसा आहे, हे लक्षात घेता येणे आवश्यक आहे आणि उत्तम आरोग्य हे सर्वात मोठी मुदत ठेव (Fixed deposit) आहे हे ही लक्षात घेणे तितकेच महत्वाचे.

तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

टेलिग्राम ॲपवर आम्हाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आमचे @arthasakshar हे चॅनेल सबस्क्राइब करा-  

https://t.me/arthasakshar

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

बी.एस.सी. नंतरचे ७ करिअर पर्याय 

Reading Time: 4 minutes बी.एस.सी. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात या लेखमालेच्या…