नोकरी जाण्याची लक्षणे – कसा कराल परिस्थितीचा सामना?

Reading Time: 4 minutes तंत्रज्ञानातील बदल, वाढत्या किमतीचा दबाव या सगळ्या गोष्टींमुळे बीएसएनएल सारख्या कंपनीवर वाईट दिवस आले व याचा परिणाम टेलिकॉम क्षेत्रावर झाला. तसेच आयटी क्षेत्रातही याचे पडसाद दिसून आले .’कॉग्निझेन्ट’ सारख्या मोठ्या कंपनी मधून तब्बल ५०० आयटी कर्मचाऱ्यांना काढण्यात आले. नोकरी गमावणे यामागे केवळ आर्थिक मंदी किंवा त्या क्षेत्रातील घसरण अशी काही करणे नसतात, तर कित्येकदा आपली वैयक्तिक कामगिरी सुद्धा तेवढीच कारणीभूत असते. कर्मचाऱ्यांचे काम चांगले नसेल, तर कोणताही इशारा न देता कामावरून कमी करण्याची कार्यवाही करण्यात येऊ शकते. सतत पुढे जाण्यासाठी ‘जागरूकता’ ही गुरुकिल्ली आहे. म्हणून कंपनीमध्ये चालणाऱ्या घडामोडी,कंपनीचं वित्तीय धोरण, आर्थिक घसरण किंवा सुधारणा याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे.