नोकरी जाण्याची लक्षणे – कसा कराल परिस्थितीचा सामना?

Reading Time: 4 minutes

नोकरी जाण्याची लक्षणे 

कर्मचाऱ्याच्या आयुष्यात अनिश्चितता आणणारे शब्द म्हणजे ‘तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. महिन्याची सगळीच गणितं ज्या पगारावर चालतात तो पगारच थांबला तर? या विचारांचं थैमान मनात नाचू लागतं. 

अलीकडच्या काळातील टेलिकॉम क्षेत्रातील गोंधळ आपण पाहिलेला असेलच. “बीएसएनएल”सारख्या नामांकित कंपनीने तब्बल ३५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, तर “एअरसेल”ने ५,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आणि “टेलिनॉर”ने ५०० कर्मचाऱ्यांना काढले. 

नोकरी सोडल्यावर तुमचे पूर्ण आणि अंतिम देय आता मिळवा २ दिवसांत

थोडक्यात सांगायचं तंत्रज्ञानातील बदल, वाढत्या किमतीचा दबाव या सगळ्या गोष्टींमुळे बीएसएनएल सारख्या कंपनीवर वाईट दिवस आले व याचा परिणाम टेलिकॉम क्षेत्रावर झाला. तसेच आयटी क्षेत्रातही याचे पडसाद दिसून आले .’कॉग्निझेन्ट’ सारख्या मोठ्या कंपनी मधून तब्बल ५०० आयटी कर्मचाऱ्यांना काढण्यात आले.    

 • नोकरी गमावणे यामागे केवळ आर्थिक मंदी किंवा त्या क्षेत्रातील घसरण अशी काही करणे नसतात, तर कित्येकदा आपली वैयक्तिक कामगिरी सुद्धा तेवढीच कारणीभूत असते. कर्मचाऱ्यांचे काम चांगले नसेल, तर कोणताही इशारा न देता कामावरून कमी करण्याची कार्यवाही करण्यात येऊ शकते. 
 • सतत पुढे जाण्यासाठी ‘जागरूकता’ ही गुरुकिल्ली आहे. म्हणून कंपनीमध्ये चालणाऱ्या घडामोडी,कंपनीचं वित्तीय धोरण, आर्थिक घसरण किंवा सुधारणा याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. 
 • कंपनीच्या मूळ वित्तीय धोरणाविषयी आपण काही करू शकत नसलो, तरीही आपली कार्यक्षमता विकसित करून नवनवीन कौशल्ये शिकण्यासाठी स्वतःला तयार ठेवावे. 
 • सभोवतालच्या परिस्थितीचा सारासार विचार करून अंदाज बांधावा. अशावेळी कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये. 
 • आपण करत असलेली नोकरी धोक्यात आहे किंवा आपली नोकरी जाऊ शकते याची सर्वात अचूक लक्षणे तो स्वतः कर्मचारीच समजू शकतात. 
 • त्यातल्या काही शक्यता त्या कंपनीच्या बॉसच्या किंवा वरिष्ठ व्यवस्थापकाच्या वर्तणुकीतील तुमच्याशी वागण्यात किंवा बोलण्यात झालेला बदलावर अवलंबून असतात. म्हणजे आपलं काम व्यवस्थित असुनही व्यवस्थापकाच्या वागण्यात नकारात्मक बदल झाला असेल, तर त्याचा नोकरी जाण्याशी संबंध येऊ शकतो. 
 • खरंतर बॉसकडून येणा-या विनाकारण दबावामुळे आपली नोकरी धोक्यात आहे, हे पटकन समजू शकते. साधारण रोज कामावर जाणा-या व्यक्तीला आपण व्यवस्थित काम करतो आहे का? हे ही माहीत असतं आणि आपली नोकरी धोक्यात आहे हे ही समजतं.
 • नुकत्याच पदव्या घेऊन नोकरीच्या बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांना सुद्धा ही जाणीव असायला हवी की मिळणारी नोकरी कायमस्वरूपीच असेल असं काही नाही, म्हणजे त्या युवक/युवतीची मानसिकता खंबीर होऊन पुढे ती त्या परिस्थितीला तोंड देऊ शकते.

तुम्ही नेहेमी कामाची डेडलाईन चुकवता? मग हे वाचा

नोकरी जाण्याची मुख्य लक्षणे –

१. वार्षिक मूल्यांकन आणि वेतनवाढीपासून वंचित राहणे  : 

 • तुम्ही २-३ वर्षांपासून काम करत असलेल्या कंपनीमध्ये तुमचं वार्षिक मूल्यांकन दिलेले नसेल किंवा वेतनवाढीची कुठलीही संधी दिसत नसेल, तर कदाचित तुमची नोकरी धोक्यात असू शकते. 
 • कॉस्ट कटिंगमुळे किंवा कंपनीचे एकूण उत्त्पन्न कमी असल्याने वेतनवाढ देण्यात आली नसेल पण आपल्या कामाचे वार्षिक मूल्यांकन मिळणे गरजेचे आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. 
 • कंपनीच्या व्यवस्थापकास किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आपल्या वार्षिक मूल्यांकनाचा अहवाल जाणून घ्या. 

२. कंपनी कॉस्ट – कटिंगच्या मार्गावर आहे. : 

 • कंपनीचं एकूण वार्षिक उत्त्पन्न कमी झाल्यामुळे कंपनी कामगार आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या मार्गावर असेल, तर अशा परिस्थितीत कदाचित तुमची नोकरी जाऊ शकते.  
 • हळूहळू कर्मचार्‍यांची पळ काढणे आणि सतत वाढ कमी करणे देखील आपल्या नोकरीस धोका दर्शवते. 
 • आपली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी आपण काम करत असलेल्या कंपनी संबंधित घडामोडींचा मागोवा घेणे आवश्यक असते. त्यामुळेच आपण येणाऱ्या  परिस्थितीसाठी तयार राहू शकतो. 

नोकरी करू की व्यवसाय?

३. व्यवस्थापक आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध बिघडणे : 

 • तुमच्या बॉसने तुम्ही पाठवलेले इ-मेल्स किंवा तुमच्या सूचना यांकडे दुर्लक्ष करणे सुरु केले असेल, तर याचा अर्थ तुम्हाला टाळलं जात आहे असा होतो. याचा परिणाम इतर सहकाऱ्यांशी असलेल्या संबंधांवर सुद्धा होऊ शकतो. 
 • जर खरच तुमची चूक असेल तर होणारी टीका स्वीकारा व दुरुस्ती करा पण जर बॉसशी काही मतभेद असतील, तर वेळेत भेटून निराकरण करा. 
 • या परिस्थितीत आपल्या कामाशी संबंधित ,किंवा कंपनीमधील आपल्या वर्तुणुकीशी संबंधित किंवा इतर कुठले वैयक्तिक कारण यापैकी नेमकं कशामुळे मतभेत आहेत ते शोधून काढा व सुधारण्याचे मार्ग शोधा . 

४. महत्वाच्या प्रोजेक्टवरून काढले जाणे : 

 • याआधी तुम्ही हाताळलेले  महत्वाचे प्रोजेक्ट्स किंवा असाईन्मेंट्स मधील तुमची कामे काढून घेऊन इतर सहकाऱ्यांवर किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर सोपवली जात असेल, तर व्यवस्थापक तुम्हाला टाळत आहेत असं समजावे आणि याचा संबंध नोकरी जाण्याशीही येऊ शकतो. 
 • तुमच्या एवढंच शिक्षण असलेला किंवा पात्रता असणा-या दुस-या व्यक्तीची नेमणूक होणे अथवा तुमच्याकडे असणा-या  महत्वाच्या फाईल्स किंवा कागदपत्रे परत देण्याची मागणी केली जाते तेव्हा ही हे कारण नोकरी जाण्याची चिंता वाढवू शकते. 
 • अशावेळी हताश न होता ,कंपनीच्या व्यवस्थापकांना प्रत्यक्ष भेटून आपल्या केलेल्या कामात काही चुका किंवा त्रुटी तर नाहीयेत ना याची शहानिशा करून घ्या.  
 • आपल्या बाजूने परिस्थिती सकारात्मक बनविण्याचा प्रयत्न करा. 

या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे

५. आवश्यकतेनुसार नवीन कौशल्य न शिकणे : 

 • आपण काम करत असलेली सिस्टिम सतत अपडेट होत असते. अनेक नवनवीन बदल होत असतात. अशावेळी आपण शिकलेल्या गोष्टी किंवा पद्धती कामी येत नाही. याचा अनुभव आयटी क्षेत्रातील लोकांना सतत येत असतो. 
 • दोन वर्षांपासून आपण एकाच ठिकाणी काम करत असाल, तर त्यामध्ये काही सुधारित आणि जलद कार्यपद्धत वापरणे कंपनीच्या नफ्यासाठी किंवा कंपनीची उत्पादकता वाढविण्यासाठी गरजेचे असते. म्हणून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नवीन व सुधारित कौशल्य शिकणे व ते रोजच्या कामात वापरणे अपेक्षित असते. 
 • तुम्ही जर स्वतःला त्याप्रमाणे अपडेट केलं नाही तर कदाचित तुमची नोकरी जाऊ शकते.

या काही लक्षणांवरून अर्थातच तुमची नोकरी धोक्यात असल्याची कल्पना येते. पण या लक्षणांवर आपण विजय मिळवू शकतो- 

 • बॉसला तुम्ही आजपर्यंत केलेल्या अचूक आणि व्यवस्थित कामाची जाणीव करून द्या. यामुळे तुमचं महत्त्व लक्षात येऊ शकते. 
 • अति भावनिकतेला महत्त्व न देता परिस्थितीला तोंड द्या व आपल्या बॉस सोबत चर्चा करून प्रत्येक मुद्दयाची छाननी करा. 
 • या दरम्यान तुम्ही जास्तीत वेळ कामावर भर द्या. आपले काम यशस्वी पूर्ण करण्यासाठी १००% प्रयत्न द्या . 
 • आपल्याला वाटणारी नोकरी जाण्याची भीती इतर सहकाऱ्यांमध्ये पसरू नये याची काळजी घ्या. 
 • कंपनीत वावरताना:ला आत्मविश्वासाने वावरा. कामाला वाहून घ्या. 
 • नकारात्मक गोष्टींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करा, स्वत:ला सकारात्मक वाटणाऱ्या व आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. 
 • याचबरोबर दुसऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतील, तर याकडेही लक्ष द्या. 

नोकरी जाईल याची सारखी भीती वाटते? मग हे वाचा…

वरील लेखामध्ये नोकरी जाण्याची लक्षणे व त्यावरील काही उपाय आम्ही सांगितले आहेत. त्या उपायांचे पालन केल्यास आपण नोकरी जाण्याची भीती, नकारात्मकता व मानसिक नैराश्य यावर मात करून व्यवस्थित पुढे वाटचाल करू शकतो. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *