Travel Insurance: प्रवास विम्याच्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes कोरोना आता निघून गेल्यातच जमा आहे. २०२१ च्या मध्यभागी पोहोचेपर्यंतच त्याची भीती आपल्या समाजातून निघून गेली होती. १०० कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण केलेल्या भारतात आता लोक दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशात फिरायला जाणं सुरू करत आहेत.यामुळे पर्यटनक्षेत्राचं अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी मदतहोत आहे. परंतु, प्रवाश्यांनी बाहेर पडताना आपला ‘प्रवास विमा’ सुद्धाजरूर काढावा. ‘प्रवास विमा’ घेण्याचा फायदा केवळ विमा कंपन्यांना होत नसून प्रवाश्यानासुद्धा त्याचा खूप फायदा होऊ शकतो.