Travel insurance
Reading Time: 3 minutes

Travel Insurance

विम्याच्या प्रकारांमधील दुर्लक्षित केला जाणारा प्रकार म्हणजे प्रवास विमा (Travel Insurance). आजच्या लेखात आपण या विमा प्रकाराबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

कोरोना आता निघून गेल्यातच जमा आहे. २०२१ च्या मध्यभागी पोहोचेपर्यंतच त्याची भीती आपल्या समाजातून निघून गेली होती. १०० कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण केलेल्या भारतात आता लोक दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशात फिरायला जाणं सुरू करत आहेत.यामुळे पर्यटनक्षेत्राचं अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी मदतहोत आहे. परंतु, प्रवाशांनी बाहेर पडताना आपला ‘प्रवास विमा’ जरूर काढावा. ‘प्रवास विमा’ घेण्याचा फायदा केवळ विमा कंपन्यांना होत नसून प्रवाशांनाही त्याचा खूप फायदा होऊ शकतो. 

हे नक्की वाचा: Fire and Burglary Insurance: आग व घरफोडीपासून विमा संरक्षण

Travel Insurance: प्रवासी विम्याद्वारे मिळणाऱ्या ८ महत्वाच्या सुविधा

१. प्रवास रद्द झाल्यास उपयोगी पडतो: 

  • जर कोणत्याही अपरिहार्य कारणामुळे तुम्ही ठरवलेला प्रवास हा तुम्हाला रद्द करावा लागला तर तुमच्या ‘प्रवास विमा’ मधून तुम्हाला ते पैसे परत मिळत असतात.
  • तुमच्या प्रवासाच्या २४ तास आधीपर्यंत फक्त तुम्ही प्रवास रद्द करण्याची सूचना प्रवास करणाऱ्या कंपनीला किंवा तुम्ही ‘प्रवास विमा’ विकत घेतलेल्या  कंपनीला दिली पाहिजे. 

२. विमान रद्द किंवा उशिरा निघणार असल्यास उपयुक्त:

  • आजकाल सतत बदलत्या नैसर्गिक, आंतरराष्ट्रीय वातावरणामुळे काही देशांची विमानसेवा ही ऐनवेळी रद्द होण्याची शक्यता असते. 
  • अशा वेळी तुमची एखादी महत्वाची बैठक, कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही वेळेवर पोहोचण्यापासून वंचित राहू शकता. तुमची ‘प्रवास विमा’ कंपनी या सर्वांचा मोबदला म्हणून तुमच्या प्रवासाचे पैसे तुम्हाला काही टक्के कपात करून परत करत असते. पण, हे शक्य होण्यासाठी तुम्ही तिकीट काढताना ‘प्रवास विमा’चा पर्याय निवडला पाहिजे. 

३. विमान चुकणे: 

  • तुम्ही तिकीट काढलेल्या विमानाच्या वेळात जर तुम्ही कोणत्याही कारणामुळे पोहोचू शकला नाहीत, तर तुमची ‘प्रवास विमा’ कंपनी त्याचे पैसे मिळवण्यात सुद्धा मदत करत असते. 
  • तुम्हाला फक्त एकच करावं लागतं की, तुमच्या परिस्थितीची माहिती ही विमानाच्या वेळेआधी ‘प्रवास विमा’ कंपनीला द्यावी लागते. 
  • तुमच्या हलगर्जीपणामुळे जर विमान चुकलं असेल, तर मात्र हे पैसे मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. 

४. आरोग्य कवच: 

  • तुम्ही करत असलेल्या प्रवासादरम्यान जर तुम्हाला हृदयविकार, दमा किंवा तत्सम एखाद्या आजाराची लक्षणं दिसली तर तुमच्या ‘प्रवास विमा’ कंपनी तुमच्या इलाजासाठी लागणारी आर्थिक मदत करत असते. 
  • तुम्ही निवडलेल्या विम्याच्या रकमेनुसार तुम्हाला डॉक्टरची फि, हॉस्पिटलमध्ये रहाण्याचा खर्च, औषधांचा खर्च ही सर्व तुम्हाला विमा असल्यास सहज मिळू शकतो. 
  • सध्या कित्येक ‘प्रवास विमा’ कंपन्यांनी प्रवासात कोरोना झाल्यास त्याच्या उपचाराचा खर्च देण्यास सुद्धा सुरुवात केली आहे. 

महत्वाचा लेख: विमा पॉलिसीमध्ये अतिरिक्त कव्हरेज देणारे “रायडर” तुम्हाला माहिती आहेत का? 

५. अन्य आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक मदत: 

  • तुम्ही करत असलेल्या प्रवासा दरम्यान जर काही कारणांमुळे तुमचा पासपोर्ट, लॅपटॉप किंवा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना हरवला किंवा तुमची बॅग किंवा पाकीट चोरीला गेलं तर ‘प्रवास विमा’ कंपनी ही तुम्हाला तात्काळ लागणारी आर्थिक मदत करण्यास बांधील असते. 
  • तुमचा ‘प्रवास विमा’ निवडताना फक्त तुम्ही या सर्व शक्यतांबद्दल तुमच्या विमा प्रतिनिधी सोबत चर्चा केली पाहिजे. 

६. सामाजिक आपात्कालीन परिस्थितीत उपयुक्त: 

  • तुम्ही ज्या गावाला, राज्यात किंवा देशात जाण्यासाठी प्रवास करत आहात तिथे जर दंगल झाली किंवा संचारबंदी लागू झाली किंवा तिथे वादळ, भूकंप आला तर तुमचा खर्च ‘प्रवास विमा’ कंपनी करत असते.
  • तुमच्या ‘प्रवास विमा’ मध्ये तुमच्या घरी परत येण्याच्या तिकिटासाठी लागणारे पैसे सुद्धा विम्यातून वळते करण्याची सोय सध्या उपलब्ध आहे. 

७. कायदेशीर बाबींचा खर्च:

  • तुम्ही जर नवीन देशात गेलेले आहात आणि तिथे तुमच्यावर कोणत्याही कारणामुळे एखादी कायदेशीर कारवाई झाली तर तो खर्च सुद्धा ‘प्रवास विमा’ कंपनी करण्यास सक्षम असते. 
  • नवीन देशात जर तुमच्याकडून जर एखादा अपघात झाला, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरीसुद्धा तुम्हाला प्रवास विम्यातून आर्थिक मदत होऊ शकते. 

८. विमान अपहरण झाल्यास मोबदला मिळतो: 

  • तुम्ही प्रवास करत असलेल्या विमानाचं जर दहशतवादी लोकांकडून जर अपहरण झालं तर तुम्हाला झालेल्या त्रासासाठी ‘प्रवास विमा’ कंपनीही तुम्हाला किंवा तुमच्या वारसदाराला पैसे देत असते. 
  • तुम्हाला जर या अपहरणादरम्यान एखादी इजा पोहोचली होती त्याच्या उपचाराचा खर्च सुद्धा ‘प्रवास विमा’ कंपनी करत असते. 

विशेष लेख: Risk Management: जोखीम व्यवस्थापनात विमा योजनेचे महत्व 

‘प्रवास विमा’ हा उशिरा उपयोगी पडणाऱ्या जीवन किंवा आरोग्य विम्यासारखा नसतो. त्याचा फायदा किंवा विमा न घेतल्याने होणारं नुकसान हे तुम्हाला लगेच सोसावं लागत असतं. जर आपण प्रवास करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करत असू तर त्याच्या ५-१०% रक्कम ही ‘प्रवास विम्यासाठी’ देण्यात शहाणपण आहे. प्रवासा दरम्यान कोणतीच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, अशी परिस्थिती उद्भवली तर मन शांत ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रवासाच्या सामानासोबत ‘प्रवास विमा’ सुद्धा घेतलाच पाहिजे. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.