भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा

Reading Time: 3 minutes भांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत. या बाबतीत अनेक प्रकारे प्रबोधन होत असूनही एक क्षण असा येतो की व्यक्तिला मोह होतो आणि ती फसते. फसवे दावे करण्यास कायदेशीररित्या बंदी असली तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत.