BHXHEM Word cloud concept illustration of Investment scams glowing light effect
Reading Time: 3 minutes

भांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत.

या बाबतीत अनेक प्रकारे प्रबोधन होत असूनही एक क्षण असा येतो की व्यक्तिला मोह होतो आणि ती फसते. फसवे दावे करण्यास कायदेशीररित्या बंदी असली तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत.

  • अलीकडेच मी माझ्या घराजवळील बँकेत पुस्तक भरून घ्यायला गेलो होतो. तेथील रिलेशनशिप मॅनेजर ने मला एका युनिट लिंक योजनेची माहिती देऊन त्यात गुंतवणूक करण्याची गळ घातली. मी त्यास प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यावर त्याने म्युच्युअल फंड योजनेची माहिती देण्यास सुरुवात केली.
  • खरंतर बँक व्यवसायाशी याचा काडीमात्र संबंध नाही आणि अशा प्रकारे बँकेमध्ये इतर योजनांचे प्रमोशन करण्यास बंदी आहे. हा व्यवसाय ठराविक मर्यादेत मूळ व्यवसायापासून वेगळा करावा अशा भांडवल बाजार नियामक यांच्या सूचना आहेत. याचे सर्वच बँकांमध्ये सरळ सरळ उल्लंघन केले जात आहे.
  • रोजच्या वर्तमानपत्रात फसवे दावे करणाऱ्या जाहिराती येत आहेत. ज्यांचे डी मॅट खाते आहे त्यांच्या वैयक्तिक माहितीची बेकायदेशीर विक्री होऊन इंदूर, सुरत, राजकोट, भावनगर येथून गुंतवणुकदारांना वारंवार फोन येत आहेत. ज्यात व्यक्तींना बोलण्यात गुंगवून ट्रेडिंग करून हमखास भरपूर फायदा करून देत असल्याचे दावे करण्यात येत आहेत.
  • भांडवल बाजारातील गुंतवणूक ही अत्यंत धोकादायक प्रकारात मोडत असल्याने यातून कोणतेही ठाम दावे करणे ही अनुचित व्यापारी प्रथा आहे. भांडवल बाजाराशी संबंधित कोणत्याही उत्पादनात असा दावा करता येत नाही. यातील धोक्याची जाणीव करून देऊन ६% ते १०% परतावा ( Return) मिळाला तर किती रक्कम कदाचित मिळू शकते तेवढेच जाहीर करता येते. आधीच्या उत्पादनातून किती टक्के परतावा मिळाला ते सांगता येते. यातील नियम मोडून अथवा त्यास बगल देऊन अनेक गोष्टी घडत आहेत.
  • अलीकडेच भांडवल बाजार नियंत्रकानी स्वतःहून कारवाई करून हमखास प्राप्ती करून देणाऱ्या आणि वार्षिक ३००% ते ८००% उतारा मिळेल अशा प्रकारचे दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या १२ संकेतस्थळे (वेबसाईट) आणि 3 व्यक्ती यांवर बंदी आणून त्यांना भांडवल बाजारातून हद्दपार केले आहे. या व्यक्ती व संकेतस्थळे खालीलप्रमाणे-
   • व्यक्ती

                           १.  Rishabh Jain

                          २. Ubaidur Rahman

                         ३. G Kadar Hussain

 • या व्यक्ती आणि संस्थांनी गुंतवणूक सल्लागार म्हणून नोदणी न करता वरील वेबसाईटच्या मार्फ़त ५ कोटीहून अधिक रक्कम सल्ला शुल्क म्हणून गोळा केले. हे शुल्क वार्षिक ७५०० रुपये ते एक लाख रुपये होते. या योजनेस ‘zero loss’, ‘jackpot’, ‘rumour based’, आणि ‘sureshot’ अशी आकर्षक नावे  होती. यांच्या सूचनांचा (टिप्स) तंतोतंतपणा ९० ते ९९% बरोबर येत असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर कडी म्हणजे एका संकेतस्थळाने नुकसान झाल्यास त्याची भरपाई करून देण्याची हमी दिली होती.
 • लोकांना सुरुवातीला काही दिवस शेअर खरेदी विक्री संबधी सूचना दिल्या फोनवरून प्रतिसाद दिला आणि अचानक  एक वर्षाची वर्गणी भरली असताना सल्ला देणे बंद केले आणि चौकशी करणाऱ्या लोकांना उत्तर देण्यात टाळाटाळ करू लागले. यासंबंधी अनेक तक्रारी सेबीकडे आल्याने त्यांच्यावर कारवाई झाली.
 • अशा तऱ्हेच्या कारवाया होत राहातील एक सजग गुंतवणूकदार म्हणून आपण अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पुन्हा काही गोष्टींची उजळणी–
  • लाभ आणि लोभ यातील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक धोकादायक प्रकारात येते याची सतत जाणीव ठेवावी.
  • गुंतवणूक सल्लागार नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.
  • रीतसर करार करावा आणि उभयपक्षांनी त्यातील अटींचे पालन करावे. अन्य छुपे करार करू नयेत.
  • आपल्या व्यवहाराची माहीती कोणास देऊ नये अशी माहिती मागणाऱ्या व्यक्तींचे नंबर त्यांच्याशी काही न बोलता ब्लॉक करावेत.
  • गुंतवणुकीवर लक्ष ठेवावे, शंका असल्यास त्याचे निराकरण करून घ्यावे.
  • आपले ट्रेडिंग खाते आपणच वापरावे आपल्या वतीने ते कोणी चालवून आपल्याला फायदा करून देईल या भ्रमात राहू नये. अपयश पोरके असते त्याची जबाबदारी कोणी घेत नाही.
  • ब्रोकर्सकडून मिळणारे एक्सपोजर लिमिट घेऊ नये.
  • काही न सुटणारा वाद असेल तर यासंबंधीची तक्रार संबंधित यंत्रणांकडे ताबडतोब करावी.

– उदय पिंगळे

भांडवलबाजार : समभाग आणि रोखे, मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

Reading Time: 5 minutes तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, सर्वात स्वस्त डेटा प्लॅन, यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून सन २०२१ पर्यंत भारतातील ७३ कोटी लोक इंटरनेट वापरत असतील असा अंदाज आहे. सध्या ऑनलाइन व्यवहारातील ७०% व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती, या माध्यमातून आपली खरी/खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. त्याने केलेली कोणतीही कृती म्हणजे “डेटा”असं आपण म्हणू शकतो. 

Cyber Security – इंटरनेट वापरताना कुठे क्लीक करताय ?

Reading Time: 2 minutes इंटरनेटच्या जगात आपण रोज अनेक वेग वेगळ्या वेबसाइट बघत असतो, कळत नकळत आपण अनेक ठिकाणी क्लीक करतो,  “Download” असं मोठ्या हिरव्या अक्षरात लिहिलेल्या अनेक पाट्या वेबसाईटवर दिसू लागतात, त्यापैकी एकावर आपण क्लीक करतो आणि जाळ्यात अडकतो … तेही एका चुकीच्या क्लीकमुळे. हा हल्ला करणाऱ्याकडून BeEF (बीफ) हे टूल वापरलं जातं. 

अपघाती मृत्यूला दहापट नुकसानभरपाई? काय आहे या मेसेजमागचे सत्य?

Reading Time: 3 minutes अपघाती मृत्यूला दहापट नुकसानभरपाई? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही…