फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवाल? लक्षात ठेवा हे तीन सुवर्ण नियम 

Reading Time: 4 minutesफसवणुकीचे गुन्हे अनेक प्रकारचे असतात. फसवणुकीला बळी पडणाऱ्या व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अडाणी अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. प्रत्येकाची कथा वेगळी, प्रत्येकाच्या समस्याही वेगळ्या. प्रत्येकालाच वाटत असतं की माझंच दुःख मोठं आहे. पण दुःखाची ही भावनाच गुन्हेगारांचे प्रमुख हत्यार आहे. सावज हेरताना गुन्हेगार सर्वात आधी त्याची  दुखरी नस ओळखतो आणि बरोबर त्यावरच फुंकर मारतो. या लेखात आपण समस्यांचे प्रकार, त्यामुळे होणारी फसवणूक, फसवणुकीचे विविध मार्ग, त्याची करणे व त्यासाठीचे खबरदारीचे उपाय याबद्दलची माहिती घेणार आहोत.