शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग २

Reading Time: 3 minutes मागील भागात आपण शेअर बाजाराच्या इतिहासाची माहिती घेतली. या भागात आपण स्टॉक एक्सचेंज आणि ट्रेडिंग व शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. शेअर बाजाराचा गुंतवणूकदारांशी थेट व्यवहार होत नाही. स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ट्रेडिंगचा परवाना असलेल्या व्यक्तीला स्टॉकचे शेअर्स खरेदी किंवा करण्याची परवानगी दिली जाते. आपल्याला एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करावयाचे असतील, तर आपल्या ब्रोकरशी संपर्क साधावा लागतो.