Reading Time: 3 minutes

मागील भागात आपण शेअर बाजाराच्या इतिहासाची माहिती घेतली. या भागात आपण स्टॉक एक्सचेंज आणि ट्रेडिंग व शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग १

स्टॉक एक्सचेंज आणि ट्रेडिंग

  • शेअर बाजाराचा गुंतवणूकदारांशी थेट व्यवहार होत नाही. स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ट्रेडिंगचा परवाना असलेल्या व्यक्तीला स्टॉकचे शेअर्स खरेदी किंवा करण्याची परवानगी दिली जाते. 
  • आपल्याला एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करावयाचे असतील, तर आपल्या ब्रोकरशी संपर्क साधावा लागतो. 
  • स्टॉक ब्रोकर किंवा काही दलाली संस्था या स्टॉक बाजार आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करतात. 
  • खरेदी विक्रीच्या व्यवहारांवर ब्रोकर्स काही माफक शल्क आकारतात, ते आपल्याला द्यावे लागते. 
  • नफा मिळवण्यासाठी कोणत्या शेअरची खरेदी किंवा विक्री करणे योग्य आहे याची माहिती ब्रोकरकडून मिळते. 
  • एकाच वेळी हजारे गुंतवणूकदारांशी व्यवहार करणे अशक्य आहे, म्हणून अशा ठिकाणी स्टॉक ब्रोकर आणि काही दलाली संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. 

शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? 

१. आपली गुंतवणूक जाणून घ्या –

  • गुंतवणूकीसाठी शेअर बाजारामध्ये अनेक प्रकारच्या संधी आहेत. पण प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या आवश्यकता आणि आर्थिक मर्यादा ओळखून किती गुंतवणूक करायची, हे ठरवायला हवे.
  • उदाहरणार्थ, तुम्हाला नुकतीच नोकरी लागली आहे आणि तुमचा मासिक पगार रूपये २०,००० एवढा आहे. त्यात गाडीचा १०,००० रूपयांचा हप्ता सुद्धा चालू आहे आणि उर्वरित खर्च ५,००० होतो. राहिलेले ५,००० रूपये गुंतवणूकीसाठी शिल्लक राहतात. अशावेळी हो ५,००० तुम्ही कमी जोखमीच्या पर्यायात गुंतवू शकता. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीबाबतीत असणारी जोखीम ओळखून निर्णय घ्यावे.

शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

२. गुंतवणूकीची योजना करा –

  • गुंतवणूकीचे निर्णय घेताना स्टॉक मार्केट समजावून घेणे आवश्यक आहे. स्टॉक्सच्या किंमतीत होणारे चढउतार समजले की त्यानुसार गुंतवणूकीचे धोरण ठरवता येते. 
  • एकदा गुंतवणूक किती व कधी करायची हे ठरवलं की योग्य समभागांची निवड करा. उदाहरणार्थ, तुमचं बजेट १००० रूपयांच आहे तर तुम्ही एक लार्ज-कॅप स्टॉक खरेदी करू शकता किंवा अनेक स्मॉल-कॅप समभाग खरेदी करू शकता. जास्त नफा मिळवण्यासाठी योग्य म्हणजे उच्च-लाभांश समभागांची निवड करा. 

३. पडताळणी करून पाहा. 

  • तुम्ही गुंतवणूक केलेल्या कंपनीची बाजारातील स्थिती जाणून घ्या. कदाचित कंपनीची  बाजारातील पत कमी होऊ शकते अशावेळी नुकसान टाळण्यासाठी कंपनीच्या कामकाजावर देखरेख असणे आवश्यक आहे. 
  • कंपनीत होणारे विलिनीकरण किंवा अधिग्रहण तसेच वरिष्ठ व्यवस्थापकांची नियुक्ती किंवा राजीनामा यांची माहिती घ्या. 
  • कंपनीचे नवीन नियम जाणून घ्या व त्याचा अभ्यास करा. 

शेअर बाजार: ये रिस्क, रिस्क है रिस्क, रिस्क!

४. योग्य वेळेची वाट पाहा. 

  • शेअर बाजारामध्ये वेळेला किंमत आहे. आज सर्वात खाली असणारे बाजार उद्या, उच्चतम स्थानावर देखील जावू शकतं
  • गुंतवणूक करताना उतावीळपणे खरेदी किंवा विक्री करू नका, कमी-जास्त होणा-या बाजाराचा आढावा घ्या , त्यानुसार योग्य वेळी गुंतवणूक करा. 
  • काहीवेळा गुंतवणूक करताना स्टॉक पुरेसे न मिळणे, बाजार घसरणे अशा अडचणी येतात अशावेळी योग्य वेळेची वाट पाहणे सोयीस्कर ठरते. 

५. पोर्टफोलिओमध्ये सुधारित बदल करणे. 

  • शेअर बाजार ही गतिमान गोष्ट आहे. काही कंपन्या क्षणात फायदेशीर वाटू शकतात, तर दुसऱ्या क्षणाला त्या बाजारामध्ये घसरलेल्या दिसतात. अनपेक्षित येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी आपल्या गुंतवणूकीच्या प्रोफाईलमध्ये (इन्व्हेस्टमेंट प्रोफाईल) किंवा पोर्टफोलिओमध्ये बदल करणे आवश्यक असते. 
  • नवीन गुंतवणूकदारांनी स्टॉकची घसरलेली किंमत पाहून घाबरून न जाता आपली गुंतवणूक नफा मिळवण्याच्या उद्देशाने वळवावी. 
  • शेअर बाजारातील अस्थिरतेवर मात करण्यासाठी पोर्टफोलिओचे परिक्षण करणे व नवीनतम बदल करणे आवश्यक आहे. 

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

पैसा हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक. भविष्याची तरतूद म्हणून आपण आपल्या ऐपती आणि इतर खर्चाच्या हिशोबानुसार बचत करतो,गुंतवणूक करतो. “शेअर बाजार” हा गुंतवणूकदारांसाठी थोडासा धाडसी पर्याय असू शकतो. कारण पारंपरिक गुंतवणूकीच्या धोरणानुसार ‘शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले की ते बुडाले ‘ असा एक जुना समज आहे म्हणून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर, पूर्वज्ञान असणं आवश्यक आहे.

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर ठाण मांडून बसलेले  व्यक्तिमत्त्व म्हणजे “वॉरन बफे“. शेअर बाजारातील एक दिग्गज महानायक म्हणून त्यांना ओळखले जाते, थोडक्यात सांगायचं तर केवळ शेअर बाजाराच्या जोरावर त्यांनी हे आर्थिक यश मिळवलं. अर्थात यामध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक आवश्यक आहे म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…