कर्जाच्या नावाने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक !

Reading Time: 3 minutes‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात बिपाशा बसू, राजूला (अक्षयकुमार) एक गुंतवणूक योजना सांगते. गोड बोलून, खोटं चित्र निर्माण करून त्याच्याकडून मोठी रक्कम घेऊन त्याला आणि त्याच्यासह बाबू भैय्या आणि शाम यांनाही फसवते. त्या खोट्या बोलण्याला फसून मोठी ‘रक्कम’ देण्याची ‘किंमत’ तिघेही भरतात. चित्रपटात बघताना हे सगळं गंमतीदार, विनोदी वाटतं. कारण परदुःख शीतल आणि पर-घटना विनोदी वाटतात.चित्रपटातील ‘हेराफेरी’ ही कितीही विनोदी वाटो पण वास्तविक आयुष्यात त्यातील एक टक्का जरी घटना घडली वा प्रसंग उद्भवला तरीही होत्याचं नव्हतं होतं. वास्तविक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळतात. ज्याने विश्वास टाकला, ज्याची प्रत्यक्ष फसगत झाली त्याचं आयुष्य उध्वस्त होत. त्याच्या कुटुंबियांचं, जे प्रत्यक्ष निर्णयात सहभागी नसतात पण त्याच्याशी  संबंधित असतात त्यांनांही मोठी झळ पोचते. अशीच एक फसवेगिरीची घटना घडली महाराष्ट्रातच नेवासा, श्रीरामपूर आणि राहूरीमध्ये. येथील अनेक लोकांची फसगत झाली.