अर्थसाक्षर अनुभव स्पर्धा – विजेता लेख क्र १

Reading Time: 4 minutes मित्रांनो आपल्या मराठी माणसांना आणि मुळातच सर्व भारतीयांमध्ये अर्थसाक्षरतेची कमी आहे. मुळात आपल्याला शाळा, कॉलेज, घरी आणि आपल्या समाजामध्ये अर्थसाक्षरतेबद्दल शिकवलं गेलं पाहिजे, माहिती दिली गेली पाहिजे पण तसं होत नाही. म्हणूनच आपल्याला माहिती नसतं की आपण एवढ्या मेहनतीने कमवलेले पैसे पुढे कसे वाढवत नेले पाहिजे, पैसे कुठे, किती आणि कसे गुंतवले म्हणजे आपली गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो.