मागिल आर्थिक वर्षांचे आय.टी.आर.(ITR) भरू शकतो का?
Reading Time: 2 minutesअशा व्यक्ती ज्यांचं एकूण वार्षिक उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना आयकर विवरण पत्र म्हणजेच आय.टी.आर.(ITR) दाखल करणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ, जर तुमचे वार्षिक उत्पन्न रू.२,५०,००० पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आयकर विवरण दाखवून योग्य तो कर भरणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत तुम्ही चालू वर्षात गेल्या दोन आर्थिक वर्षांचे आयकर विवरण पत्र दाखल करू शकता.