Browsing Tag
bank account
10 posts
Kids Saving Account – नियम आणि वैशिष्ट्ये
Reading Time: 2 minutesमुलांना जबाबदारी शिकवणं आणि त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजीही घेता येणं यातून आपण आपलं उत्तम पालकत्व निभावत असतो. आणि अशीच संधी आपल्याला मिळते ती या मुलांचे बचत खाते उघडून. हे खाते उघडण्याची प्रक्रिया इतर बचत खात्यांप्रमाणेच असली तरी या खात्याला मिळणाऱ्या सोई आणि सुविधा सामान्य खात्यांपेक्षा वेगळ्या आहेत. अर्थात हे खाते लहान मुलांकडून हाताळले जाणार असल्याने काही चुका होण्याची शक्यता असते म्हणूनच बँकांनी काही मर्यादा घालून दिल्या आहेत. हे खाते उघडण्यापूर्वी पालकांनी त्या वैशिष्ट्यांकडे लक्ष दिले पाहिजे.
Current Account & Saving Account: चालू खाते आणि बचत खाते यामधील मूलभूत फरक
Reading Time: 3 minutesबँकेमध्ये अनेक प्रकारची खाती उघडली जातात, यातील दोन प्रमुख खाती म्हणजे चालू खाते आणि बचत खाते (Current Account & Saving Account). या दोन्ही संकल्पनांमधला आणि त्या खात्यांसाठी मिळणाऱ्या सुविधांमधला मूलभूत फरक आपण आज समजून घेणार आहोत. अनेकांना बचत खाते सामान्य लोकांसाठी आणि चालू खाते व्यवसायिकांसाठी एवढीच माहिती असते.
माझे पैसे कोणत्या बँकेत कसे ठेऊ किती ठेऊ?
Reading Time: 4 minutesबचत आणि गुंतवणूक यांच्या अनेक योजना आहेत. आपल्याकडील पैसे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, भविष्यकालीन गरज या सर्वांचा विचार करून कमी अधिक प्रमाणात पैशांची विभागणी करावी लागते. यात सुरक्षितता, परतावा आणि रोकडसुलभता यांचाही विचार करावा लागतो. या सर्वाचा विचार करून काहीतरी रक्कम आपल्याला बँकेत ठेवावी लागते. बँकेत ठेवलेले पैसे, जरी ते कोणत्याही योजनेत असले तरी आपल्याला मागणी केल्यास ताबडतोब मिळू शकतात. तेव्हा आपण कोणत्या बँकेत किती पैसे ठेवावे? कसे ठेवावेत? असे प्रश्न पडणे साहजिकच आहे.
बँक ठेव सुरक्षा मर्यादेत भरीव वाढ
Reading Time: 3 minutesपीएमसी बँक घोटाळ्यानंतर बँक ठेव सुरक्षा मर्यादा वाढवायला हवी या मागणीस जास्त जोर आला. वास्तविकपणे सन २०११ मध्ये स्थापन केलेल्या दामोदरन कमिटीने आपल्या अहवालात ही मर्यादा ५ लाख रुपये एवढी वाढवावी. बँकेस आजारी घोषित केल्यावर ताबडतोब ही रक्कम ग्राहकांना मिळायला हवी अशी शिफारस केली होती. यापैकी ठेव सुरक्षा मर्यादा वाढवल्याने फक्त अर्धीच मागणी पूर्ण होत आहे आणि १ मे १९९३ नंतर आता १ एप्रिल २०२० पासून म्हणजेच जवळपास २७ वर्षांनी ही मर्यादा भरीव प्रमाणात वाढवली जात आहे.
बँक बुडाली? किती पैसे परत मिळतील? जाणून घ्या सगळे नियम
Reading Time: 4 minutesगेल्या काही वर्षात बँक बुडण्याची साथच आलेली आहे. पोल्ट्रीच्या कोंबड्या जशा एका रात्रीत मारतात तशी एखादी बँक एका रात्रीतच मरून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून खातेदार रागावून, चिडून बँकेकडे धाव घेतात. त्यांना फक्त १ हजार रुपये काढण्याची परवानगी मिळते. पेपर आणि टीव्हीमध्ये गवगवा होतो. दोषारोपण होते. काहीच दिवसात जनता हे सगळे विसरून जाते न जाते, तोच दुसरी बँक बुडते. वाचकहो अशावेळी सरकार काय संरक्षण देते हे जाणून घेण्यासाठी आजचा हा लेख वाचा…
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा
Reading Time: 4 minutesआजच्या टेक्नो सॅव्ही जमान्यात गुन्हेगारही मागे राहिलेले नाहीत. त्यांनीही टेक्नॉलॉजीचा फायदा आपल्या गुन्ह्यांसाठी करून घेत त्यामध्ये बरीच मजल मारली आहे. “सोय तितकी गैरसोय” म्हणतात ते काही उगाच नाही. अनेक सुशिक्षित लोकही सायबर क्राईमचे बळी ठरत आहेत. असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला भुलून आपल्या बँक खात्याची व वैयक्तिक माहितीही देतात आणि लाखो रुपये गमावतात.
प्रधान मंत्री जन-धन योजनेअंतर्गत बँक खाते उघडाल?
Reading Time: 2 minutesजन-धन बँक खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे ज्यांना या योजनेची खरी आवश्यकता आहेत त्यांना त्याचे फायदे मिळतील याची खात्री होते. प्रधानमंत्री जन धन योजनेतून लाभ मिळविण्यासाठी पुढील पात्रता निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे.