तुमचा क्रेडिट रिपोर्ट कितपत खरा आहे?
Reading Time: 4 minutesमाहिती अधिकाराचा प्रसार प्रचार करणारे श्री गिरीश मित्तल यांनी अलीकडेच एका बँकेचे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केला होता परंतू “TransUnion CIBIL ltd” या कंपनीने त्यांचे मूल्यांकन ६६२ म्हणजेच विश्वासार्ह नाही, असा अहवाल दिल्याने, ते खराब असल्याचे कारण देऊन क्रेडिट कार्ड देण्यास नकार दिला. नियमितपणे २५ वर्षे काटेकोरपणे आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तीस हा मोठा धक्का होता.