Cyber Crime: सायबर आर्थिक गुन्ह्यांचे बळी भारतीयच अधिक का?
Reading Time: 4 minutes भारतात सायबर गुन्ह्यांचे (Cyber Crime) प्रमाण अधिक वाढले आहे, असा निष्कर्ष मायक्रोसॉफ्टच्या एका पाहणीत समोर आला आहे, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करण्यातही काही शहाणपणा नाही. डिजिटल आणि ऑनलाईनच्या नव्या युगात आपल्याला वर्तनात काही बदल करून घ्यावे लागणार आहेत. ते आपण केले तरच या गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात राहू शकेल.