सिम स्वॅप फ्रॉड
https://bit.ly/2PBktsG
Reading Time: 3 minutes

सावधान : सिम स्वॅप फ्रॉड

सिम स्वॅप फ्रॉड! सावधान!!! तुमचं सिम कार्ड (मोबाईल क्रमांक) आता तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं झालंय! तुमच्या सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना दुर्लक्षित करू नका. कारण तुमचं बँक अकाउंट आता धोक्यात आहे! खोटं वाटतंय? मग हे वाचा..

का आहे सीम कार्ड महत्वाचं?

  • काही वर्षांपूर्वी बँकेचे थोडेफार तपशील वापरून तुमच्या खात्यातील रक्कम चलाखीने चोरणं फार सोपं झालं होतं. म्हणून अधिक सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बँकांनी खातेदाराच्या बँक अकाउंटला आपला मोबाईल क्रमांक जोडणे बंधनकारक केले.
  • यामुळे बँक खात्यातील रक्कम पूर्वीपेक्षा सुरक्षित झाली खरी पण हा परिपूर्ण तोडगा नव्हता, कारण इंटरनेट बँकिंगचा वाढता वापर, सोशल मिडिया वर संवेदनशील माहितीचं हस्तांतर, अनेक अनौपचारिक (unauthentic) बँकिंग ॲप आणि वेबसाईट यामुळे बँकेतील जमा आणखीन असुरक्षित झाली.
  • त्यानंतर आली ‘टू फॅक्टर व्हेरिफिकेशन (two-factor verification) ही संकल्पना! ज्यामध्ये, तुम्ही कोणतेही ऑनलाईन व्यवहार करताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक OTP (वन टाईम पासवर्ड) पाठवला जातो. ही प्रक्रिया एक प्रकारे खातेदाराकडून पैसे पाठवण्याची परवानगी मागते.
  • त्यामुळे तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक कोणत्याही असुरक्षित हातात पडणे ही धोक्याची घंटा असू शकते. याचा अर्थ अर्थात तुमच्या खात्यातील पैशावर डोळा असणाऱ्या चोराचं लक्ष सर्वात आधी तुमच्या मोबाईल सीम कार्ड वर जाईल.
  • म्हणूनच, तुमच्या मोबाईल सीम मिळवला की तुमच्या खात्यातील रक्कम कोणत्याही क्षणी गायब होऊ शकते! सावध व्हा!! तुमच्या मोबाईल क्रमांकासोबत होणारे कोणताही फ्रॉड नजरअंदाज करू नका.

रिफंडची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आलाय? सावधान

काय आहे सिम स्वॅप फ्रॉड?

  • गुन्हेगार तुमच्या मोबाइल नंबर हरवला आहे किंवा चोरीला गेला आहे, अशी खोटी तक्रार नोंदवून त्याच नंबर साठी मोबाईल कंपनी कडून नवीन सीम मिळवतो.
  • आता हा मोबाईल क्रमांक तुमच्या बँक अकाउंटशी जोडलेला नोंदणीकृत मोबाइल नंबर असल्याने गुन्हेगार तुमच्या बँकेचे सर्व व्यवहार या सीमचा वापर करून करू शकतो.
  • ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यासाठी आवश्यक वन टाइम पासवर्ड (ओटीपी) देखील याच नवीन सीम वर पाठवला जातो आणि गुन्हेगार तुमच्या सीम चा वापर करून लाखोंची रक्कम बँक खात्यातून काढून घेऊ शकतो
  • आता तुम्ही म्हणाल, “लाखो रुपये चोरावे इतके पैसेच आमच्या खात्यात नसतात, मग गुन्हेगार अमच्या हजारांच्या रकमेसाठी कशाला इतका उपद्व्याप करेल?” पण लक्षात घ्या, हे फॉड़ करणारे नेहमी सराईत गुन्हेगार नसतात. तंत्रज्ञानाची माहिती असणारे खूप तरुण या मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. छोट्याश्या रकमेनेही हे बेरोजगार समाधानी होतील आणि आपल्या प्रत्येकाला आपल्याकडे असणारी थोडीफार रक्कम ही प्रिय असते. त्यामुळे सर्वानीच सतर्कता पाळणे गरजेचे आहे.

कशी केली जाते फसवणूक?

  • आक्रमणकर्ता व्यक्तीचे बँकिंग खाते तपशीलासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबर आपले लक्ष करतो.
  • त्यानंतर आक्रमणकर्ते मोबाइल फोन गमावण्याचा दावा करून व्यक्तीची वैयक्तिक ओळख तयार करतात आणि त्यांच्या नावाखाली डुप्लिकेट सिमसाठी अर्ज करतात.
  • एकदा खात्री केली की, मोबाइल सेवा पुरवणारी कंपनी जुने सिम कार्ड (व्यक्तीकडे असलेले खरे) निष्क्रिय करते आणि नवीन सिम कार्ड गुन्हेगार प्राप्त करतो.
  • त्यामुळे व्यक्तीच्या फोनवर नेटवर्कअभावी कोणताही एसएमएस किंवा अलर्ट-ओटीपी, यूआरएन इ. मिळू शकणार नाही. म्हणूनच व्यक्तीलाही कळत नाही की आपल्या सोबत फॉड़ होत आहे.
  • गुन्हेगाराकडे फिशिंग किंवा ट्रोजन/मालवेअरद्वारे पूर्वीच्या व्यक्तीचे सर्व बँकिंग तपशील आधीपासूनच मिळालेला असतो. त्यामुळे, आपल्या खात्याचा तपशील मिळवणे व ते ऑपरेट करणे किंवा वित्तीय व्यवहार करणे त्यांच्यासाठी सोपे आहे.
  • सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, आपल्या सोबत हा गुन्हा होतोय याची जाणीव देखील आपल्याला होत नाही

डी-मार्ट चे फ्री कुपन मिळणारा व्हॉट्सॅप मेसेज : आणखी एक भयंकर गंभीर ऑनलाईन फ्रॉड

सिम स्वॅप फ्रॉड कसा ओळखाल?

  • सिम कार्ड फसवणूकी प्रत्यक्षात घडण्यापूर्वीच त्याची माहिती मिळणे कठीण आहे.
  • असा फॉड़ झाल्यानंतर लक्षात येतो. जेव्हा खरा ग्राहक कॉल किंवा मेसेज करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अडचण येते.
  • एकदा गुन्हेगाराने खरे सिम निष्क्रिय केले की, संदेश आणि कॉल खऱ्या ग्राहकाकडे जाणार नाहीत. आणि हेच सर्वात मोठे लक्षण आहे.
  • त्यामुळे अशी घटना दुर्लक्षित करू नका. काही बँका या विरुध्द सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न करते तरीही, ग्राहकाची सतर्कता सिम स्वॅप फसवणुकीस होण्यापासून रोखू शकते.

हे माहित आहे का?

  • खरं तर सिम स्वॅप द्वारे फसवणूक कठीण आहे. कारण, काही बँकांनी अशा प्रकारच्या फसवणूकीपासून वाचवण्यासाठी आपल्या ग्राहकांना संरक्षित करण्यासाठी सुरक्षेचा स्तर उंचावला आहे.
  • काही सुरक्षा उपायांमध्ये ‘सिम रीइशूईंग’ आणि ‘आयएमएस’ अलर्ट संदेश पाठवला जातो. जर आयएमएसआय नंबर व्यक्तीच्या सिम कार्ड नंबरशी जुळत नसेल तर हा गुन्हा होण्यापासून टाळला जाऊ शकतो.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.