Reading Time: 2 minutes

‘सायबर क्राईम’ हा शब्दप्रयोग काही आता नवीन नाही. इंटरनेटचं विश्वच एवढं मोठं आहे की कितीही प्रयत्न केला, सावधगिरी बाळगली तरीही सायबर क्राईमच्या वेगवेगळ्या युक्त्या लढवून लोकांना गंडा घालणारे रोज नवीन नवीन पद्धतीचा उपयोग करत असतात.

अशीच एक घटना घडली आहे, इटलीची कंपनी ‘टेक्निमोंट एसपीए’च्या भारतीय युनिटमध्ये. ही घटना भारतातील आजवरच्या ‘सायबर क्राईम’  जगतातील सर्वात मोठी घटना ठरली आहे. चायनीज हॅकर्सनी इटलीची सब्सिडीअरी कंपनी असलेल्या ‘टेक्निमोंट एसपीएच्या’ भारतीय यूनिटला १.८६ कोटी डॉलर्स (साधारणतः १३० कोटी रुपये) एवढया मोठ्या रकमेचा गंडा घातला आहे.

नक्की काय आणि कसं घडलं टेक्निमोंट एसपीएच्या भारतीय यूनिटमध्ये?

 • संबंधित कंपनीच्या भारतीय युनिटमध्ये हॅकर्सनी एक ईमेल केलं. हे ईमेल ज्या ईमेल अकाउंटमधून केलं गेलं ते ईमेल अकाउंट कंपनीचे ग्रुप सीईओ ‘पिएरोबर्टो फोलगिएरो’ यांच्या ईमेल अकाउंटसारखेच होते.
 • त्यानंतर हॅकर्समार्फत चीनमध्ये होणाऱ्या ऍक्विझिशनसंदर्भात ‘गुप्त माहिती’ सांगण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी कॉन्फरन्स कॉल करण्यात आला.
 • या कॉन्फरन्स कॉलमध्ये ग्रूपचे सीईओ, स्वित्झर्लंडचे नामांकित वकील आणि कंपनीचे अन्य वरिष्ठ कार्यकारी अधिकारी सामील झाले असल्याचा बनाव करण्यात आला.
 • हॅकर्सनी सदर कंपनीच्या भारतातील मुख्य अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना सांगितले की, “काही आर्थिक नियामक संदर्भात अडचणींमुळे (Regulatory Issues) इटलीमधून रक्कम ट्रान्सफर करणे शक्य नाही.”
 • त्यानंतर भारतामधील मुख्य अधिकाऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये एका आठवड्यात तीन वेळा वेगवेगळी रक्कम (अनुक्रमे ५६ लाख डॉलर, ९४ लाख डॉलर आणि ३६ लाख डॉलर) हाँगकाँगच्या एका बँकेत ट्रान्स्फर केली.
 • सदर रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर काही मिनिटांतच अकाऊंटमधून काढण्यात आली होती.
 • त्यानंतर हॅकर्सनी चौथ्या वेळाही रक्कम ट्रान्सफर व्हावी म्हणून प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत डिसेंबरमध्ये चेअरमन ‘फ्रैंको गिरिनगेली’ भारतामध्ये आल्यानंतर संबंधित धोक्याचा कट उघड झाला असल्याने त्यांना यश मिळाले नाही.

काय आहे कंपनीची भूमिका?

 • ‘टेक्निमोंट एसपीए’ ही इटलीमधील ‘माईरे टेकनिमॉन्ट’ नावाच्या एका मोठ्या बिझनेस ग्रूपची सब्सिडीअरी कंपनी असून अभियांत्रिकी, ऊर्जा आणि रसायने (Engineering, Energy and Chemicals) यासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यान्वित आहे.
 • कंपनीच्या मते हा कुठलाही ‘सायबर क्राईम’ नसून कंपनीमध्ये करण्यात आलेला मोठा गैरव्यवहार (Fraud) आहे.
 • “कंपनीने ‘फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन’ सुरु केले असून आम्ही लवकरच आमचे पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न करू. तसेच या केससंदर्भातील कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी मुंबईतील एका प्रसिद्ध ‘लॉ फर्मची’ नेमणूक करण्यात आली आहे.” अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पत्रकारांना देण्यात आली. मात्र याव्यतिरीक्त इतर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.
 • तसेच काही ‘न्यूज पोर्टलवर’ दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील ‘सिक्युरिटी फर्म क्रोल’ देखील या प्रकरणाचा तपास करीत असून, यामध्ये फ्रॉडच्या केसेसचा तपास करणारी फर्म ‘एमझेडएम (MZM)’ कायदेविषयक मदत करीत आहे.
 • एमझेडएम (MZM) चे  लीगल आणि मॅनेजिंग पार्टनर ‘जुल्फीकार मेमन’ यांनी सांगितलं, “हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांमार्फत केलेला एक गंभीर ‘इलेक्ट्रॉनिक फ्रॉड’ असून यामध्ये हाय-एंड टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.”
 • मुंबई सायबर क्राईम ब्रँचकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, या प्रकरणामुळे कंपनीच्या भारतीय युनिटमधील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, अकाऊंटस आणि फायनान्स हेडलाही कंपनीतून काढून टाकण्यात आलं आहे.

सायबरतज्ञांच्या मते, संबंधित हॅकर्सनी ग्रूप चेअरमनच्या लेखनशैलीचा अभ्यास करून त्याचे अनुकरण केले. यासाठी  कंपनीच्या आयटी सिस्टीममध्ये प्रवेश करून कंपनीच्या ईमेलचा अभ्यास करणारी अत्याधुनिक यंत्रणा हॅकर्सकडून वापरण्यात आली असण्याची दाट शक्यता आहे.

कंपनीच्या अंतर्गत तपासणीमध्ये, “कॉन्फरन्स कॉलवरील सर्वांचे  आयडी फेक असल्याचं सिद्ध झाले आहे. ‘लुइगी कोराडी’ या नावाचा कुठलाही स्विस वकील अस्तित्वात नसून, हे नाव १९२१ साली मृत्यू पावलेल्या एका प्रसिद्ध इटालियन अभियंता आणि शिक्षकाचे आहे.

पैसे ट्रान्सफर करण्यात आलेल्या हाँगकाँगमधील बँकेत चौकशी केली असता, ते खाते बनावट कागदपत्रांद्वारे उघडले गेले असल्याचे उघड झाले.

ही घटना भारतातील इंटरनेट जगताला हादरवून सोडणारी आत्तापर्यंतची सर्वात मोठी ‘सायबर क्राईमची’ घटना आहे.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2RoMSYG )

रिफंडची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आलाय? सावधान,   आयकर रिफंडचे संशयास्पद इमेल्स आणि करदात्यांची फसवणुकइंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग ३इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग २

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

मोटार अपघाताची नुकसान भरपाई?? व्हॉट्सॅप मेसेजने केलेली दिशाभूल..

Reading Time: 2 minutes काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ॲपवर एक मेसेज आला होता; पोळी का करपते? दूध…