कल्कीची मोहमाया
Reading Time: 3 minutes

कल्कीची मोह‘माया’

कलियुगात विष्णू आपला दहावा आणि शेवटचा कल्की अवतार घेणार या पुराणातील कथेचा गैरफायदा घेऊन, कल्कीची मोहमाया दाखवून अनेक लोक आपला ‘बिझनेस’ सेट करत आहेत.  चंद्रावर घरासाठी प्लॉट विकण्याचा प्रकार असो वा उत्तम परताव्याचं अमिष दाखवून केलेली फसवणूक असो, फेसबुकच्या मैत्रीतून होणारा सायबर क्राईम असो वा अजून काही फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. 

 • काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून एका सुशिक्षित महिलेला लाखो रुपयांना गंडा घातल्याची बातमी वाचनात आली होती.
 • त्याआधीही नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखो रुपयांना होणारी फसवणूक समोर आली आहे. 
 • सायबर क्राईम घटनांमध्ये महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे.
 • याशिवाय मोठमोठे स्कॅम्स तर होतच असतात. ज्यामध्ये कितीतरी लोक आपल्या आयुष्यभराची कमाई गमावतात.

सुरुवातीला बुवाबाजीपर्यंत सीमित असणाऱ्या या फसवणुकीच्या गुन्ह्यांसाठी सध्या मात्र इंटरनेट हे एक प्रभावी माध्यम ठरलं आहे. त्यामुळे आजच्या डिजिटल जमान्यात गुन्ह्यांचं स्वरूपही बदलत आहे. आजच्या लेखात आपण कल्कीची मोहमाया आणि त्या जाळयात अडकलेल्यांची व्यथा जाणून घेणार आहोत. 

हे नक्की वाचा: सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा

कल्कीची मोह‘माया’:

 • फसवुकीसंदर्भातील नुकत्याच एका गुन्ह्याची बातमी वाचून हसावं रडावं हेच कळत नाही
 • “जुनं तेच सोनं” म्हणत बुवाबाजी करून माया जमा करणाऱ्या विष्णूच्या तथाकथित  “कल्की” अवताराच्या आश्रमात आयकर विभागाला जवळपास अब्जावधी रुपयांची रोकड सापडली आहे.
 • याच महाशयांच्या दुसऱ्या आश्रमावर मारलेल्या छाप्यात ४०९ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आलं आहे. 

कोण आहे कल्की? 

 • लाइफ इन्श्युरन्स कार्पोरेशनमध्ये क्लार्कची नोकरी करणाऱ्या विजय कुमार यांनी १९८० पासून आपल्या बिझनेस समूहाची सुरुवात केली. शिक्षण, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन आणि क्रीडा क्षेत्रासह केवळ भारतातच नाही तर परदेशातही या समुहाचे जाळे पसरले आहे.
 • ट्रस्टच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रम व अध्यात्म इत्यादींचे “ट्रेनिंग प्रोग्रॅम” आयोजित केले जात असत. अध्यात्माचे आकर्षण असणारे अनेक परदेशी नागरिक यामध्ये सामील होत असल्यामुळे, परदेशी चलनही मोठ्या प्रमाणावर मिळू लागलं.
 • सन १९९० मध्ये विजय कुमार यांनी स्वत:ला विष्णूचा दहावा अवतार कल्की असं घोषित केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक मान्यवर व्यक्ती आणि सिने जगतातील व्यक्ती त्यांचे शिष्य/ अनुयायी झाले. शेवटी “झुकती हैं दुनिया, झुकानेवाला चाहीये”, असं म्हणतात ते काही खोटं नाही.
 • या  ट्रस्टमध्ये या तथाकथित कल्कीची पत्नी पद्मावती आणि मुलगा एनकेव्ही कृष्णा यांनाही भागीदार करण्यात आले होते.
 • आयकर विभागाच्या छाप्यात कोट्यवधी रुपयांचं सोनं, हिरे, २५ लाख अमेरिकन डॉलर आणि ५०० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती सापडली आहे. ट्रस्टच्या पावत्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणारा गैरव्यवहार, जमिनीची मोठ्या प्रमाणावर होणारी खरेदी आणि चढ्या दराने होणारी विक्री असे अनेक प्रकारही समोर आले आहेत.
 • विष्णूचा आठवा अवतार असणाऱ्या श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला. परंतु विष्णूच्या या तथाकथित “कल्की” नामक अवतार पुरुषास लवकरच तुरुंगवास भोगावा लागणार आहे.  

हे नक्की वाचा: पॉन्झी स्कीमच्या सापळ्यात फसलेल्या शांताबाईंची व्यथा

समाजाची मानसिकता:

 • समाज म्हणजे अनेक व्यक्तींचा समूह. या समाजात श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अडाणी, प्रामाणिक, चलाख, सज्जन,  धूर्त, कावेबाज असे सर्वप्रकारचे लोक राहत असतात. प्रत्येकाचे गुणविशेष वेगवेगळे असतात. तशाच प्रत्येकाच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. 
 • “जगी सर्व सुखी असा कोण आहे?” हे रामदास स्वामींनी काही शतकांपूर्वी सांगितलेलं सत्य लहानपणी जवळपास सर्वांनीच ऐकलेलं असेल. परंतु तरीही प्रत्येकालाच असं वाटत असतं की माझंच दुःख मोठं आहे. 
 • अशा परिस्थितीत दुःखावर फुंकर घालणारं किंवा आयुष्याचं, धर्माचं तत्वज्ञान सांगणारं कोणी भेटलं, तर मग माणूस चटकन त्याला भाळतो आणि मग स्वतःचीच फसवणूक करून घेतो.
 • कधी झटपट श्रीमंत होण्याची आशा, तर कधी चांगल्या कंपनीत नोकरी मिळविण्याची दिवास्वप्ने, कधी इंटरनेट वरील मैत्रीचे मायाजाल, तर कधी फसव्या प्रेमाचे मृगजळ अशा अनेक कारणांमुळे फसणाऱ्यांची संख्या कमी नाही.

संबंधित लेख: फसव्या योजना कशा ओळखाल?

अशाच एखाद्या कल्कीची मोहमाया तुम्हालाही भुरळ पाडू शकते –

 • “अध्यात्म” म्हणजे नक्की काय? तुम्हाला अध्यात्माची आवड असेल, तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. चांगल्या विश्वसनीय ठिकाणी आध्यात्मिक ज्ञान मिळत असेल, तर ते जरूर घ्या. पण तुमची मेहनतीची कमाई अशा भोंदू बाबांवर उधळून टाकू नका. 
 • तुमच्या पैशांवर पहिला हक्क तुमच्या कुटुंबाचा आहे. कोणत्याही भोंदू बाबाचा नाही. अशा ठिकाणी पैसे खर्च करण्यापेक्षा तेच पैसे तुमच्या मुलांचे शिक्षण, भविष्याच्या तरतूद, आपत्तकालीन निधी, इ. अनेक गोष्टींसाठी वापरता येतील. 
 • पुराणानुसार ‘कल्की’ हा विष्णूचा दहावा आणि शेवटचा अवतार मानला जातो. कल्की कलियुगात जन्म घेऊन सर्व वाईट गोष्टींचा नाश करेल आणि या अवताराबरोबरच विष्णूचे अवतारकार्य संपेल, अशी कथा पुराणात लिहिलेली आहे. 
 • पुराणामध्ये उल्लेखलेल्या कथांनुसार कोणत्याही अवतारात विष्णूने मी अवतारी आहे, असं सांगून कधी स्वतःच्या अवतार कार्याचा डंका पिटला नाही.उलट, आपल्या वागण्यातून/ करामतींमधून ते दाखवून दिलं. याचप्रमाणे इतरही महान साधू संतांनी कधी स्वतः अवतारी असल्याचा दाखला दिला नाही की लोकांकडून पैसा उकळला नाही. उलट लोकहितासाठी काम केले. 
 • आता विचार तुम्ही करा. असा डंका पिटणारे खरंच अवतारी असतील का? पैसे घेणारा कधीही महान नसतो. उलट अशी माणसे तुमच्या भावनांशी खेळत असतात. धर्माचा अपमान करता असतात आणि समाजाची शांती बिघडवून टाकत असतात. त्यांना फक्त तुमच्या पैशाशी मतलब असते, तुमच्या समस्यांशी नाही. खोटे चित्र उभे करून तुम्हाला फसवणारे कित्येकजण तुमच्या अवती – भवती फिरत असतील. त्यांच्यापासून सावध रहा. 

परमेश्वराला श्रद्धा महत्वाची आहे. पैसा नाही. तेव्हा श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको. स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियाला फसव्या मनोवृत्तीच्या मांणसांपासून वाचवा. अशी माणसे आढळल्यास तुमच्या निकटवर्तीयांना सावध करा. शक्य असल्यास पोलिसांची मदत घ्या. सावध रहा, सुरक्षित रहा.

इतर लेख: फसव्या विमा पॉलिसींचा सापळा

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

मोटार अपघाताची नुकसान भरपाई?? व्हॉट्सॅप मेसेजने केलेली दिशाभूल..

Reading Time: 2 minutes काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ॲपवर एक मेसेज आला होता; पोळी का करपते? दूध…