Electric cars: आगामी काळात रस्त्यावर धावतील या ५ आकर्षक इलेक्ट्रिक कार

Reading Time: 3 minutes मागील काही वर्षांत जगभरातील वाहन उद्योगात प्रचंड परिवर्तन वेगाने होत आहे. २०१७ ते २०१८ मध्ये जागतिक इलेक्ट्रिक वाहनांची (Electric cars) विक्री ६५% ने वाढली. या काळात २.१ दशलक्ष वाहने तयार झाली. २०१९ मध्येही ही वाढ सुरूच राहिली, मात्र कोरोना विषाणूचा उद्रेकामुळे २०२० मधील पहिल्या तिमाहित विक्री घटली व २५% कमी झाली. परंतु, नवीन इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सुधारीत बॅटरी, चार्जिंगची उपलब्ध सुविधा, नवी बाजारपेठ आणि कंबनशन इंजिन (ICE) वाहनांनुसार वाजवी किंमत अशी वैशिष्ट्ये असल्याने त्यांची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.