Electric Cars
Reading Time: 3 minutes

Electric cars

मागील काही वर्षांत जगभरातील वाहन उद्योगात प्रचंड परिवर्तन वेगाने होत आहे. २०१७ ते २०१८ मध्ये जागतिक इलेक्ट्रिक वाहनांची (Electric cars) विक्री ६५% ने वाढली. या काळात २.१ दशलक्ष वाहने तयार झाली. २०१९ मध्येही ही वाढ सुरूच राहिली, मात्र कोरोना विषाणूचा उद्रेकामुळे २०२० मधील पहिल्या तिमाहित विक्री घटली व २५% कमी झाली. 

ब्लूमवर्ग न्यू एनर्जी फायनान्स (BNEF)  या संस्थेने  केलेल्या सर्वेनुसार –

  • नवीन इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सुधारीत बॅटरी, चार्जिंगची उपलब्ध सुविधा, नवी बाजारपेठ आणि कंबनशन इंजिन (ICE) वाहनांनुसार वाजवी किंमत अशी वैशिष्ट्ये असल्याने त्यांची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 
  • २०२५ पर्यंत जगभरातील प्रवासी वाहनांची विक्री १०% नी वाढेल. 
  • २०३० मध्ये ती २८ टक्के तर,
  • २०४० पर्यंत ५८ टक्क्यांनी वाढेल. 

Electric cars: आगामी काळात रस्त्यावर अवतारणारी टॉप ५ इलेक्ट्रिक कार

१. एमजी सायबर्स्टर (MG Cyberster): 

Electric Cars

  • जगातील पहिली शुद्ध इलेक्ट्रिक सुपर स्पोर्ट्स गेमिंग कॉकपीट एमजी सायबर्स्टरची लवकरच मोठ्या प्रमाणावर निर्मिती होणार आहे. 
  • एक्सटेरिअरमध्ये एमजी सायबर्स्टररने टीकाऊ एमजीबी रोडस्टर्स क्लासिक कन्हर्टेबल बॉडी स्टाइल असून सॉलीड स्पोर्ट्स कार पोश्चर मिळते. 
  • ‘विंडहंटर’ फ्रंट फेस डिझाइन हे अगदी वेगळे व ठसा उमटवणारे आहे.
  • मोड्युलर बॅटरी (सीटीपी) टेक्नोलॉजी असल्याने ८०० किमीचा अल्ट्रा लाँग एंड्युरन्सदेखील मिळतो. ती ०-१०० किमी/तास वेग फक्त ३ सेकंदात धारण करण्यास सक्षम आहे. 
  • यात ऑटोनॉमस एल३ इंटेलिजंट ड्रायव्हिंग सिस्टिम आहे. 
  • एमजी सायबर्स्टर ही केवळ संकल्पनाच नसून, ती लवकरच मोठ्या प्रमाणावर उत्पादित होण्याची अपेक्षा आहे.

२. टेस्ला मॉडेल ३ (Tesla Model 3): 

 

  • टेस्लाने अखेर बहु प्रतीक्षित कारची पहिली आवृत्ती उत्पादित केली. 
  • हे प्रीमियम रेंज मॉडेल, ४४,००० डॉलर मध्ये उपलब्ध असून ५०० किमी/३१० मैलांपर्यंत पोहोचते. या रेंजमध्ये प्रथमच एवढी किफायतशीर किंमत देण्यात आली आहे. 
  • इलेक्ट्रिक कारचा काळ अधिकृतरित्या आला आहे, हे नक्कीच म्हणता येईल.

३. वोल्वो एक्ससी४० रिचार्ज (Volvo XC40 Recharge-): 

  • वोल्वोने पहिली पूर्ण इलेक्ट्रिक एक्ससी४० रिचार्ज कार ऑक्टोबर २०१९ मध्ये आणली असून त्यात अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. 
  • गूगलच्या नव्या अँड्रॉइड ऑटोमेटिव्ह सॉफ्टवेअर सपोर्टेड इन्फोटेनमेंट सिस्टिमही यात आहे.
  • टेस्लाकडून प्रेरणा घेत, वोल्वोने तयार केलेली ही पूर्ण इलेक्ट्रिक कार बाजारात धूम माचएगी. 
  • याचा  वेग  ४०० किमी / २५० मैल. किंमत: ४५,६०० डॉलर(अंदाजे)

४. ऑडी ए९ ईट्रॉन (Audi A9 eTron -preliminary name): 

  • २०१८ मध्ये ऑडी एसयूव्ही लाँच केल्यानंतर ऑडी पूर्णपणे इलेक्ट्रिक लक्झरी सेडान २०२४ पर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे.
  •  ए९  ईट्रॉन हे ऑडीचे कॉम्बॅट टेस्लाचे मॉ़डेल एस आहे. या कारमध्ये ऑटोनॉमस ड्रायव्हिंगचीही सुविधा असेल. 
  • ऑडीच्या प्रमुखांनी घोषणा केली की, बॅटरीवर चालणाऱ्या सर्व ऑडीकारपैकी २५% कार मालकी घेण्याची कंपनीची योजना आहे.

५. बीएमडब्ल्यू एक्स३ / बीएमडब्ल्यू ४ सीरीज जीटी (BMW X3 / BMW 4 Series GT-): 

  • बीएमडब्ल्यूने त्यांच्या आय५ योजना रद्द केल्या असून आता एक्स३ आणि ४ सीरीज जीटीसारख्या इतर सीरीजचे इलेक्ट्रिफिकेशन करण्यावर ते भर देत आहेत. 
  • बीएमडब्ल्यूच्या कॉम्बॅटनंतर टेस्लाचे मॉडेल ३ हे २०२१ पर्यंत लाँच होण्याचा अंदाज आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Electric Cars in Marathi, Electric Cars Marathi Mahiti, Electric Cars Marathi, Top 5 Electric Cars 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.