ESG Funds: शाश्वत गुंतवणूकशैली जोपासणारे ईएसजी फंड
Reading Time: 4 minutesजगापुढे असलेल्या अनेक समस्यांपैकी- अन्न सुरक्षितता, असमान प्रगती, बेरोजगारी, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता, लिंग असमानता, महायुद्धाची शक्यता यासारख्या प्रमुख समस्यांची सोडवणूक शाश्वत जीवनशैली स्वीकारल्यासच होऊ शकेल याबद्दल बहुतेक तज्ज्ञांमध्ये एकमत आहे. त्यादृष्टीने जागतिक पातळीवरील विविध संघटना आपल्या सदस्यांनी आचरण पद्धतीत कोणते बदल करावे याबाबत मार्गदर्शन करत असतात. यादृष्टीने म्युच्युअल फंड योजनांत ईएसजी योजनांकडे विशेष योजना म्हणून पाहता येईल.