प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

Reading Time: 3 minutes या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रस्तावित असलेली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (PM-SYM) योजना सुरू झालेली आहे. आपल्या पंतप्रधानानी या योजनेचे औपचारिक उद्घाटन १५  फेब्रुवारी २०१९ रोजी गांधीनगर येथे केले. या योजनेनुसार यातील लाभार्थीना ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 3000/- (रुपये तीन हजार) एवढे निश्चित निवृत्तीवेतन मिळेल. या योजनेच्या निवडक लाभार्थीना PM-SYM या पेन्शनकार्डचे वाटप करण्यात आले.