कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा

Reading Time: 3 minutesकोव्हिड-१९ या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा लक्षात घेता, हे लॉकडाऊन अजून वाढवण्यात आले आहे. हा वेळ म्हटलं तर सक्तीचा आणि कंटाळवाणा वाटू शकतो आणि म्हटलं तर याचा सदुपयोगही करता येऊ शकतो. वेबसिरीज, सिनेमे यामुळे वेळ छान जातही असेल, पण या काळात काही आर्थिक नियोजन करता येतं का? याकडेही लक्ष देऊ या.  या लॉकडाऊनच्या काळात, कोणत्या आर्थिक बाबी पहायला हव्यात, याबाबत या लेखातून जाणून घेऊ.