गोष्ट दोन गुंतवणूकदारांची…

Reading Time: 4 minutesबहुसंख्य लोकांचा असा समज असतो की ‘गुंतवणूक करणं’ आणि ‘यशस्वी गुंतवणूकदार बनणं’ या दोन्ही एकसारख्याच गोष्टी आहेत. प्रत्यक्षात या विभिन्न गोष्टी आहेत आणि त्यांचा अनेकदा परस्परसंबंध नसतो. म्हणजेच ‘गुंतवणूक कशी करावी’ हे माहिती झाले म्हणजे आपण आपोआप एक यशस्वी गुंतवणूकदार बनू शकतो असे अजिबात नाही. सिंहगडाचा ट्रेक करणे आणि एव्हरेस्टचा ट्रेक करणे यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक त्या दोन्हीत आहे. हा फरक अत्यंत सोप्या पद्धतीने विषद करणारा एक लेख मध्यंतरी वाचनात आला, तो ‘अर्थसाक्षर’च्या वाचकांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.