Titan – टायटन कंपनीची यशोगाथा (भाग २)
Reading Time: 4 minutesआशियाई व युरोपियन बाजारपेठेत ‘टायटन’ला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भारतीय तरुणाईला भुरळ घालणाऱ्या डिझाइन्सना तिकडच्या बाजारपेठेत मात्र, पसंतीची दाद मिळत नव्हती. अपेक्षांची गणितं चुकली होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी, ‘टायटन’ने तिथल्या बाजारपेठेतील ग्राहकांच्या अपेक्षा विचारात घेतल्या. त्यावर पुनर्विचार केला. त्या बाजपेठेच्या स्ट्रॅटेजी बदलून, संबंधित धोरणे बदलून त्यांच्यासाठी खास वेगळे डिझाइन्स बनवून घेतले. यामुळे ‘टायटन’ च्या यशोगाथेत आणखी एक सुवर्ण पान लिहिले गेले, यात शंकाच नाही.