Success Story Of Titan
Reading Time: 4 minutes

Success Story Of Titan 

टायटन कंपनीचे नाव माहिती नाही, असं भारतात कोणीच सापडणार नाही. पण किती जणांना या कंपनीचा इतिहास (Success Story Of Titan) माहिती आहे? अर्थसाक्षर तर्फे आम्ही दर आठवड्याला भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती देणारी लेखमाला प्रसिद्ध करणार आहोत. त्या कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करावी असं कुठलाही सल्ला आम्ही देत नसून, केवळ माहितीसाठी त्या कंपन्यांचा व्यवसाय, इतिहास, प्रवर्तक, भविष्यातील संधी या इतर काही बाबी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करणार आहोत.

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती देणाऱ्या लेखमालेमधील पहिली कंपनी आहे ‘टायटन’! 

‘शेअर मार्केट म्हणजे सट्टा’, 

‘शेअर मार्केट म्हणजे जुगार’! ,

शेअर मार्केट हा फक्त श्रीमंतांसाठीचा शौक आहे, वगैरे वगैरे अनेक भंपक कल्पनांना आपण चिकटून आहोत. 

शेअर्स खरेदीचं सूत्र

 • तुम्ही जर  नोव्हेंबर २००९ मध्ये रु. १०,००० बजाज फायनान्सच्या शेअर्स मध्ये गुंतवले असते, तर आज त्यांचे एकूण बाजारमूल्य जवळपास रु. १६ लाख २८ हजार इतके असते. याव्यतिरिक्त  कंपनीने वेळोवेळी दिलेले डिव्हिडंड तर या गुंतवणूक परताव्यात आपण मोजलेले नाहीत. १ नोव्हेंबर २००९ रोजी रु.२५ मध्ये मिळणारा बजाज फायनान्सचा शेअर या १ नोव्हेंबर २०१९ ला तब्बल रु. ४०७० पर्यंत वाढलेला होता. वैयक्तिक कर्ज, ग्राहकउपयोगी वस्तू खरेदीसाठी कर्ज, विमा यांसारखे व्यवसाय करणाऱ्या बजाज फायनान्सने गेल्या १० वर्षांत जवळपास १६२ पट परतावा दिला आहे. इथून पुढच्या १० वर्षात तितकाच परतावा मिळेल असे नाही. शेअर मार्केट मधील सुयोग्य, अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक किती फायदेशीर होऊ शकते यासाठी घेतलेले हे एक उदाहरण आहे.
 • वरील आकडेवारी बऱ्याचदा अविश्वसनीय वाटेल. ते आपल्यासारख्या तात्कालिक विचारशक्ती आणि भावनाप्रधान बहुसंख्य भारतीय समाज बांधवांसाठी  सहाजिकच आहे. आपण एका वर्षात दुप्पट करणाऱ्या पॉन्झी स्कीम्सकडे पटकन आकर्षित होतो पण डोळ्यासमोर असणाऱ्या, साक्षात आपण स्वतः नेहेमी त्या कंपन्यांचे ग्राहक असताना, कंपनीची चौफेर प्रगती बघत असतानाही केवळ शेअर मार्केटची बेसिक माहिती नसल्याने किंवा पूर्वग्रहदूषित मते न बदलल्याने मोठ्या संधींना मुकत असतो.
 • गाडी भरधाव वेगाने, नको त्या वेळी, नको त्या रस्त्यांवर, नको त्या पद्धतीने चालवल्यावर आपला अपघात जसा नक्की आहे, तसाच शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा प्रवास अभ्यास न करता, सांगो वांगी टिप्सवर आधारीत केल्यास, नक्की काय सुरु आहे हे समजून न घेतल्यास प्रचंड कठीण आहे. 

सरकारी कंपन्यांवरील विश्वास की खासगी कंपन्यांची कार्यक्षमता?

 • निरोगी शरीरासाठी समतोल आहार, योग्य व्यायाम, पुरेशी झोप या किमान ३ गोष्टी आवश्यक आहेत. कुठल्याही प्रकारे या गोष्टी तुम्ही ‘आउटसोर्स’ करू शकत नाही त्याचप्रमाणे ठणठणीत आर्थिक आरोग्यासाठी आपली विचार करण्याची शक्ती, अभ्यास करण्याची आणि निर्णय घेण्याची शक्ती सुद्धा आपण दुसऱ्याला द्यायला नको.
 • “Investing is simple, but not easy !” असे महान गुंतवणूक गुरु वॉरेन बफेट यांचे एक सुवचन आहे. तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने सर्वांच्या गुंतवणूक विषयी ज्ञानात भर घालायचा प्रयत्न आपण करूयात. 
 • या लेखांमध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात सुचविलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Titan – टायटन कंपनीच्या प्रवासाची सुरवात 

 • भारतातील काही उद्योग समूह केवळ भारतातच नव्हे, तर आशिया खंडात, जगभरात प्रसिद्ध आणि महत्वाचे ठरले आहेत.
 • टाटा उद्योगसमूह हा सुद्धा यांपैकीच एक. हा एक बहुराष्ट्रीय कंपनी असलेला खाजगी समूह आहे.
 • टाटा समूहाच्या शाखा विस्तारतच गेल्या आहेत. रसायने, पोलाद, वाहन निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दुरसंपर्क, ऊर्जा, आतिथ्य यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात या समूहाने आपली मोहोर उमटवली आहे.
 • ‘टायटन’ (Titan) कंपनीला आपण सर्वजण बऱ्याच वर्षांपासून ओळखतो.
 • ‘टायटन’ (Titan) ब्रँड टाटा समूहाचाच एक प्रमुख घटक आहे. तसेच, हा ब्रँड ‘टाटा कन्सल्टन्सी’ नंतरचा टाटा उद्योगसमूहाचा सर्वात मोठा घटक समूह ठरला आहे. 
 • महान संगीतकार मोझार्टची २५ क्रमांकाची सिंफनी आपण भारतीय मात्र टायटन घड्याळाची जाहिरात म्हणूनच ओळखतो.
 • बऱ्याच लोकांना त्या जाहिरातीतले संगीत म्हणजे टायटनची सिम्फनी असेच डोक्यात फिट बसले आहे. तुम्हाला ते पुन्हा ऐकायचे असेल तर येथे क्लिक करा.
 • तुम्ही जर  नोव्हेंबर २००९ मध्ये रु. १ लाख टायटनच्या  शेअर्स मध्ये गुंतवले असते, तर आज त्यांचे एकूण बाजारमूल्य जवळपास रु. २१ लाख असते. याव्यतिरिक्त  कंपनीने वेळोवेळी दिलेले डिव्हिडंड तर बाजारमूल्यात आपण मोजलेले नाही.
 • १ नोव्हेंबर २००१ रोजी रु.६२ मध्ये मिळणारा टायटनचा शेअर या १ नोव्हेंबर २०१९ ला तब्बल रु. १३०१ पर्यंत वाढलेला होता. टायटनने गेल्या १० वर्षांत जवळपास २०००% परतावा दिला आहे. 
 • तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की टाटा समूहाचा एक भाग असलेली ‘टायटन कंपनी’ केवळ घड्याळेच बनवत नाही तर ज्वेलरी, अक्ससेसरीज, साड्या या इतर विविध ग्राहक उपयोगी वस्तू विकते.
 • संपूर्ण जगात टायटन पाचवी सर्वात मोठी घड्याळ उत्पादक कंपनी आहे. 

शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

कशी झाली टायटन ब्रँडची निर्मिती:

 • आर्थिक उदारीकरणापूर्वी, आपली अर्थव्यवस्था परदेशी गुंतवणूकदारांसाठी खुली करण्यापूर्वी ‘परवाना राज’ च्या काळात भारतात व्यवसाय करणे मोठ्या कंपन्यांसाठी कठीण होते. घड्याळे तयार करणे हा व्यवसाय तेव्हा लघु आणि छोट्या उद्योगांसाठी आरक्षित केला गेला होता. मीठा पासून ते पोलादनिर्मितीपर्यंत आणि गाड्यांपासून ते सॉफ्टवेअर विकणाऱ्या महाकाय टाटा उद्योगसमूहाला त्यामुळे घड्याळे निर्मितीचा परवाना मिळत नव्हता. 
 • सदर परवाना ‘तमिळनाडू इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन’ (TIDCO) कडे होता. टाटांनी त्यांच्याबरोबर जॉईंट व्हेंचर करून टायटन ची स्थापना केली. टाटा इंडस्ट्रीज आणि तमिळनाडू यांच्या नावातून ‘टायटन’  या प्रकल्पाचं नामकरण झालं, ‘टायटन’ !
 • सर्व वयोगटांना, विशेषतः तरुणाईला भुरळ घालणारे डिझाइन्स बनवणे, हे नव्याने मार्केट मध्ये आलेल्या या ब्रँड समोरचे मुख्य आव्हान होते. ‘टायटन’ हा उदयाला येऊ पाहणारा ब्रँड व TIDCO यांच्या संयुक्त विद्यमाने हासुर(तामिळनाडू) इथे पहिली फॅक्टरी उभारली गेली. जवळच बँगलोर मध्ये असणाऱ्या एच.एम.टी. मुळे कुशल मनुष्यबळाची उपलब्धता होती.
 • कंपनीला सरकारने ४० लाख घड्याळे बनवायचे लायसेंस दिले होते त्यापैकी ३२ लाख मेकॅनिकल वॉचेस  ते केवळ ८ लाख मनगटी घड्याळ बनवायचे होते.सुरवातीला मेकॅनिकल वॉचेसच्या उत्पादनावर ह्या प्रकल्पाचं लक्ष केंद्रित झालं होतं. पण तत्कालीन मार्केटची गरज पाहता, ‘क्वार्ट्झ’ वर लक्ष केंद्रित केले जाऊन, त्यात आवश्यक ते बदल केले गेले. या प्रकल्पाचे श्री.एक्स देसाई हे पहिले CEO होते.   
 • एच.एम.टी., सिटीझन, ओलवीन या घड्याळ्यांच्या ब्रॅण्डचे वर्चस्व त्याकाळात भारतीय बाजारांत होते. त्याचबरोबर कस्टम शॉप्स मधून परदेशातून आयात केलेली घड्याळ खरेदी करण्यात लोकांचा ओढा होता. टायटनच्या सुरुवातीच्या काळात घड्याळ ही सर्वात जास्त स्मगलिंग करून भारतात आणल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक होती. 
 • टायटनच्या घड्याळांनी मात्र थोड्या कालावधीतच आपला जम बसवला. उत्कृष्ट दर्जा,उत्तम ग्राहक सेवा, वस्तूंमध्ये दोष असल्यास बदलून द्यायची गॅरंटी, आक्रमक जाहिराती यामुळे टायटन भारतभर वाढत गेला. मॉल संस्कृती उद्याच्या फार पूर्वी टायटन ने आपली स्वतःची दुकाने सर्वत्र थाटली होती. 
 • भारतीय बाजापेठेत मिळवलेला लौकिक परदेशी बाजारपेठेत ही मिळावा, म्हणून ‘टायटन’ ने काही ‘युरोपियन’व ‘आशियाई’ बाजारपेठेत प्रवेश केला. परंतु हाच लौकिक तिथल्या ही बाजारपेठेत मिळवण्यासाठी अथवा टिकवून ठेवण्यासाठी ‘टायटन’ हा ब्रँड ‘टाटा उद्योग समूहाचा’ असणं इतकंच पुरेसं नव्हते. ग्राहकांच्या पसंतीला उतरणं हा कळीचा मुद्दा होता.

पुढील भागात टायटनचा परदेशी बाजारातील प्रवास, त्यातील अडथळे याबद्दलची माहिती जाणून घेऊ. –

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती – टायटनची यशोगाथा (भाग २)

For suggestions and curries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…