गुंतवणुकीच्या चुकीच्या कल्पना

Reading Time: 3 minutesसमाज माध्यमं आणि वृत्तपत्र, टीव्ही अशी पारंपरिक माध्यमांमधून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अर्थसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. त्यामुळे बहुसंख्य समाजापर्यंत अनेक संकल्पना पोचल्या आहेत. खरेतर या सगळ्या माहितीचा भडीमार सातत्याने सुरु आहे. मात्र या एकमार्गी संभाषणामुळे गुंतवणूकदारांच्या सवयी कितपत बदलत आहेत? तर फारशा नाहीत. याचे एक महत्त्वाचे कारण आपण गेल्या आठवड्यात बघितले – गुंतवणूक क्षेत्रातील ग्राहकाभिमुख असणाऱ्या वितरक, एजन्ट किंवा रिलेशनशिप मॅनेजर अशांच्या गैरप्रथा आणि त्यातून गुंतवणूकदारात निर्माण होणारी अनास्था आणि उदासीनता. त्याचबरोबर दुसरे मला जाणवलेले एक कारण म्हणजे गुंतवणूकदारांच्या मनातल्या अनेक चुकीच्या कल्पना.