आर्थिक नियोजन आणि स्त्री – आर्थिक सल्लागाराच्या नजरेतून
Reading Time: 3 minutesगेली अनेक वर्षे आर्थिक सल्लागार म्हणून काम करताना लक्षात आले की सर्वसामान्यपणे स्त्रिया आपल्या आर्थिक नियोजनात काहीशा मागे असतात. अर्थार्जन आणि आर्थिक नियोजन ही कामे कौटुंबिक आयुष्यात पुरुषांची मक्तेदारी असल्याचा एक समज नकळतच आपल्या समाजमनात रुजलेला आढळतो आणि स्त्रियादेखील त्यांच्यावरील इतर सर्व जबाबदाऱ्यांची ओझी पेलता पेलता आर्थिक नियोजनाकडे काहीसे दुर्लक्ष करतात. त्यात देखील एकट्या स्त्रियांची अवस्था अजूनच बिकट असते. “महिलांचे आर्थिक नियोजन” या विषयावर थोडक्यात आढावा.