शेअर बाजार: ये रिस्क, रिस्क है रिस्क, रिस्क!

Reading Time: 3 minutes शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जास्तीची जोखीम. ही थिअरी आजकाल सर्वांना तोंडपाठ असते. मात्र बहुसंख्य गुंतवणूकदारांमध्ये ही जोखीम उचलायची तयारी फक्त बाजार वर जातानाच असते. बाजारात पडझड सुरु झाली की या लोकांची चुळबुळ सुरु होते. मार्केट पुन्हा कधी वर जाणार, पुन्हा जागतिक मंदी येणार का? अमक्या चॅनेल वर पुढील दोन वर्षे खराब जातील सांगितलं मग गुंतवणूक थांबवूया का? अशा विचारणा सुरु होतात.