कसे कराल बोनसचे नियोजन?

Reading Time: 3 minutes आर्थिक नववर्षाची सुरुवात करून देणारा एप्रिल महिना बहुसंख्य नोकरदारांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. त्यांचे वार्षिक अप्रायजल झालेले असल्यामुळे साधारण याच सुमारास त्यांना त्यानुसार वार्षिक बोनस मिळणार असतो व पुढील वर्षासाठीची पगारवाढ ठरणार असते. बोनस किंवा तत्सम इतर कुठलाही एकरकमी मोठा निधी हातात आला, की त्याच्या खर्चाला वाटा फुटायला वेळ लागत नाही. तसे होऊ नये यासाठी अशा ‘लम्प-सम’च्या गुंतवणुकीचा विचार प्रत्येकाने आधीपासूनच करणे योग्य असते.