आपल्या आधार कार्डचा गैरवापर कसा शोधाल?

Reading Time: 2 minutes आपलं आधार कार्ड भारतातील एक महत्वाचे ओळखपत्र आहे. १२ अंकी युनिक ओळख नंबर (Unique Identification Number) असलेल्या आपल्या आधार कार्डास आपला मोबाइल नंबर, पॅन आणि बँक खात्यास जोडणे अनिवार्य करण्याचा निर्णय आला आणि देशात ‘राईट टू प्राईवसी’चं वादळ उठलं. आपली सर्व माहिती धोक्यात आहे आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो, या भावनेने काहीसं असुरक्षिततेचं  वातावरण निर्माण झालं. आता तुमच्या आधार कार्डचा कुठे गैरवापर होतोय का? हे तुम्ही तपासू शकता.