आपलं आधार कार्ड भारतातील एक महत्वाचे ओळखपत्र आहे. १२ अंकी युनिक ओळख नंबर (Unique Identification Number) असलेल्या आपल्या आधार कार्डास आपला मोबाइल नंबर, पॅन आणि बँक खात्यास जोडणे अनिवार्य करण्याचा निर्णय आला आणि देशात ‘राईट टू प्राईवसी’चं वादळ उठलं. आपली सर्व माहिती धोक्यात आहे आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो, या भावनेने काहीसं असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं. आता तुमच्या आधार कार्डचा कुठे गैरवापर होतोय का? हे तुम्ही तपासू शकता.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने (UIDAI) आपल्या वेबसाइटवर एक पर्याय दिला आहे ज्याद्वारे आपलं आधार कार्ड कोठे वापरलं गेलं आहे याबद्दलची माहिती आपल्याला समजू शकते.
आपला आधार क्रमांक कोठे वापरला गेला, हे आपण कसे शोधाल?
१. https://www.uidai.gov.in/ या यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. उजव्या कोपऱ्यात भाषा निवडीसाठीचा पर्याय उपलब्ध आहे. त्यानुसार आपली भाषा निवडा.
३. माझा आधार – आधार सेवा – आधार प्रमाणीकरण इतिहास वर क्लिक करा.(For English – My Aadhaar – Aadhaar Services – Aadhaar Authentication History)
४. यानंतर एक नवीन वेबपेज ओपन होईल. आपला आधार क्रमांक येथे प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
५. बॉक्समध्ये दिलेला सुरक्षा कोड भरल्यानंतर ओटीपी आपल्या मोबाईलवर पाठवला जाईल.
६. त्यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल त्यावर तुमचा आधार क्रमांक कोणत्या प्रकारे प्रमाणित करण्यासाठी वापरला आहे, हे कळू शकते.
७. सूची मध्ये उपलब्ध पर्यायांमध्ये बायोमेट्रिक्स, डेमोग्राफिक्स, ओटीपी, डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक, बायोमेट्रिक आणि ओटीपी आणि लोकसंख्याशास्त्रीय आणि ओटीपी पर्याय समाविष्ट आहेत. जर आपण आपल्या आधारचा वापर करून केलेल्या प्रत्येक नोंदी तपासायच्या असल्यास, ‘सर्व’ हा पर्याय निवडा.
८. मागील ७ महिन्यांचा लेखाजोखा तुम्ही इथे पाहू शकता. नक्की कोणत्या कालावधीतील माहिती तुम्हाला तपासायची आहे ते नमूद करा.
९. तुम्हाला मिळालेला ओटीपी प्रविष्ट करा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.
१०. आधार वापरून केलेल्या सर्व क्रिया त्यांची तारीख, वेळ आणि प्रकार याची सूची तुम्हाला मिळेल. मात्र ही विनंती कोणी केली हे कळणे शक्य नाही.
११. आपल्याला काहीही संशयास्पद आढळल्यास आपण यूआयडीएआयच्या १९४७ या नंबरवर कॉल करुन तक्रार नोंदवू शकता.
आधार हा सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे. त्याचबरोबर ते एक महत्वपूर्ण आणि संवेदनशील कागदपत्र आहे. आपलं आधार कार्ड ही आपली जबाबदारी आहे. आधारचे फायदे जसे अत्यंत लाभदायक आहेत, तसेच आधारचा गैरवापर मोठे नुकसान करू शकतो. प्रमाणित कार्यालयाशिवाय अन्य कोणालाही आपला १२ अंकी आधार क्रमांक व त्याबाबतची कोणतीही माहिती देऊ नका. यासंदर्भात यूआयडीएआयने (UIDAI) जरी केलेल्या सर्व नियम आणि सूचनांचे पालन करा.
आपलं आधार कार्ड सुरक्षित आहे का?,
आधार बरोबर पॅन लिंक करणे अनिवार्य !,
प्लॅस्टिक आधार कार्ड अधिकृत नाही
आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |
1 comment
Nice