भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -“पिडीलाईट’ची यशोगाथा”(भाग १)

Reading Time: 3 minutes स्टेशनरी दुकानात डिंक विकत घ्यायला ग्राहक आल्यावर “एक फेविकॉलची ट्यूब द्या” अशी मागणी करतो. डिंक म्हणजे फेविकॉल हे समीकरण भारतीयांच्या डोक्यात अनेक वर्षांपासून पक्के बसले आहे. टीव्ही वरच्या जाहिरातींच्या माऱ्यात आपल्या आवडत्या मालिका बघताना फेविकॉलच्या जाहिराती मात्र लक्ष आकर्षित करतात. ‘ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नही!’  ही टॅगलाईन फेविकॉल सारखीच ग्राकांच्या डोक्यात चिकटली आहे. फेविकॉल बरोबरच फेविस्टीक, फेविक्विक, डॉकटर फ़िक्सिट, एम् – सील  अशा अनेक ब्रँडची मालकी ‘पिडीलाईट इंडस्ट्रीज’ कडे आहे. १९६९ मध्ये स्थापन झालेल्या पिडीलाईट ने  २०१९ मध्ये ५० वर्षे पूर्ण केली असून विविध देशांमध्ये यशस्वी विस्तार करून “भारतीय मल्टीनॅशनल कंपनी” अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.