फसव्या योजना ओळखण्याची ६ लक्षणे

Reading Time: 2 minutes फसव्या योजना बनवून लोकांना ठगणारे अनेक बंटी आणि बबली समाजात उजळ माथ्याने फिरत असतात. या फसव्या योजनेचा कोणालातरी फटका बसतो आणि मग बाकीचे  सावध होतात. “पुढच्यास ठेच, मागचा शहाणा” ही म्हण आपल्याकडे उगाच प्रचलित नाही. चुका प्रत्येकजण करतो, पण ती चूक एकदा झाली की त्याच माणसाने तर ती पुन्हा करूच नये, परंतु इतरांनीही त्यातून योग्य धडे घेऊन ती चूक एकदाही करू नये. हीच गोष्ट पैशांबद्दलही लागू होते.