Reading Time: 2 minutes

फसव्या योजना

फसव्या योजना बनवून लोकांना ठगणारे अनेक बंटी आणि बबली समाजात उजळ माथ्याने फिरत असतात. या फसव्या योजनेचा कोणालातरी फटका बसतो आणि मग बाकीचे  सावध होतात. “पुढच्यास ठेच, मागचा शहाणा” ही म्हण आपल्याकडे उगाच प्रचलित नाही. चुका प्रत्येकजण करतो, पण ती चूक एकदा झाली की त्याच माणसाने तर ती पुन्हा करूच नये, परंतु इतरांनीही त्यातून योग्य धडे घेऊन ती चूक एकदाही करू नये. हीच गोष्ट पैशांबद्दलही लागू होते. 

गुंतवणूक सगळ्यांनाच करायची असते, आपला पैसा वाढलेला कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आहे आणि कसा आहे याची माहिती असल्याशिवाय फक्त दाखवलेल्या आकर्षित व्याजदरांमागे धावू नये.

एखादी फसवी योजना कशी ओळखावी याची काही पुस्तकी व्याख्या नाही. पण प्रात्यक्षिक उदाहरणं नक्कीच आहेत. आणि त्यातून आपण शिकलं पाहिजे. आकर्षक व्याजदर असं सांगून १४-१५ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर किंवा अगदीच कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याच्या गोष्टी कोणीही उदारपणे इतरांसाठी करत नाही. किंबहुना हे अशक्यच आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी पुढील गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतःच्याच हातून स्वतःचे आर्थिक नुकसान टाळा.

हे नक्की वाचा: Cyber Crime: सायबर आर्थिक गुन्ह्यांचे बळी भारतीयच अधिक का?  

फसव्या योजना ओळखण्याची ६ लक्षणे

१. संपूर्ण माहिती-

ज्या पर्यायात किंवा योजनेत गुंतवणूक करायची असं ठरवलं असेल, त्या पर्यायाची किंवा योजनेची आणि ती देऊ करणाऱ्या संस्थेची सुरूवाती पासून आत्तापर्यंतची सगळी माहिती मिळवा. आजवरचा त्यांच्या ह्या योजनांचा इतिहास पहा, लोकांचा त्यातला अनुभव तपासा. हे सगळं समजून घेऊन गुंतवणुकीचा निर्णय निश्चित करा.

२. अत्युच्च परतावे- कोणतीही समाधानकारक कारणं आणि पारदर्शक कार्यपद्धती सिद्ध न करता उगाच अव्वाच्या सव्वा परतावा मिळण्याची खात्री हे ती योजना फसवी असण्याचं पहिलं लक्षण आहे. नविनच आलेल्या, इतर सरकारी योजनांपेक्षा जास्त परतावे देण्याची भाषा करणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळा.

महत्वाचा लेख: Mobile Security: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का? 

३. शे्अर बाजारातील खात्रीशीर परतावे– इक्विटी किंवा डेरिवेटीव्ह मार्केटमधून खात्रीशीर परतावे देण्याच्या कोणत्याही तोंडी किंवा लेखी वचनांना आजिबात बळी पडू नका. “इतके गुंतवल्याने इतक्याच कालावधीत इतकी रक्कम नक्की मिळेल” अशा गोष्टी खऱ्या असत्या, तर आज कोणालाही शेअर बाजाराची आणि त्यातल्या रिस्क फॅक्टरची इतकी भिती वाटली असती का? विचार करा.

४. सेबीअंतर्गत नोंदणी– कोणताही गुंतवणुकीचा पर्याय किंवा योजना देऊ करणारी संस्था सिक्यूरिटीज अँड एक्स्चेन्ज बोर्ड ऑफ इन्डिया अर्थात सेबी (SEBI)  ह्या भारतातील आर्थिक सुरक्षिततेचे नियमन करणाऱ्या सरकारी संस्थेअंतर्गत नोंदणीकृत आहे का, हे सर्वप्रथम तपासा.

५. रोख व्यवहार– स्टॉक ब्रोकर म्हणजेच दलालांशी कधीही रोखीचे व्यवहार करू नका. शक्यतो चेक किंवा ऑनलाईन व्यवहार करण्यास प्राधान्य द्या. चेक किंवा ऑनलाईन व्यवहारांची नोंद आपल्याबरोबर बँकेकडेही असते. अन्यायकारक प्रकरणात दाद मागण्यासाठी हा अधिकृत पुरावा म्हणून गृहित धरला जाऊ शकतो.

६.जोखीम – फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) प्रकारात बरीच जोखीम असते. अशा पर्यायात गुंतवणूक करण्याआधी त्या पर्यायाची आणि रिस्क फॅक्टरची संपूर्ण माहिती घ्या.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…