घर: विकत घ्यावे की भाड्याने राहावे?
Reading Time: 3 minutesकुठल्याही मोठ्या निर्णयाबाबत होते तसे घर विकत घेणे किंवा भाड्याने घेणे या दोन्ही पर्यायांच्या बाजूने आणि विरुद्ध अनेक मुद्दे आहेत (त्यामुळेच तर सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो). ‘आपले स्वतःचे घर’ ही कल्पनाच सुखद असते, स्वतःच्या घरामुळे कुटुंबाला स्थैर्य मिळते, त्याचबरोबर गृहकर्ज काढून घर विकत घेतल्यास कर वजावट मिळते, भविष्यात घराच्या किमती वाढतात त्यांचा फायदा होतो वगैरे मुद्दे घर विकत घेण्याच्या बाजूने आहेत.