Reversal Chart Patterns: शेअर ट्रेडिंगमधील रिव्हर्सल चार्ट पॅटर्न

Reading Time: 3 minutes चार्टमध्ये तयार होणारे आकृतिबंध म्हणजेच पॅटर्न. हे पॅटर्न दोन प्रकारे दिसतात, एक रिव्हर्सल चार्ट पॅटर्न व दुसरे कॅन्टीनुशन चार्ट पॅटर्न. ज्या वेळी एखाद्या शेअर मध्ये तेजी किंवा मंदीचा ट्रेंड पूर्ण झाल्यावर,  रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला तर त्यात आपणस किंमत रिव्हर्स होण्याचे संकेत मिळतात अपट्रेंड मध्यें जर बेरीश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला तर शेअरची किंमत खाली येते आणि जर मंदीच्या ट्रेंड मध्ये बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न तयार झाला, तर शेअर मध्ये तेजीचे संकेत मिळतात. चार्टमध्ये आपणस अनेक रिव्हर्सल पॅटर्न दिसून येतात. डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, रायजिंग वेज, फेलिंग वेज, राऊंडिंग बॉटम. आज आपण शेअर बाजारात ट्रेडिंग व गुंतवणूक करताना ट्रेडिंगच्या धोरणानुसार वापरात येणारे काही महत्वाच्या रिव्हर्सल चार्ट पॅटर्न्सबद्दल (Reversal Chart Patterns) माहिती घेऊया.