Kids Saving Account – नियम आणि वैशिष्ट्ये
Reading Time: 2 minutes मुलांना जबाबदारी शिकवणं आणि त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजीही घेता येणं यातून आपण आपलं उत्तम पालकत्व निभावत असतो. आणि अशीच संधी आपल्याला मिळते ती या मुलांचे बचत खाते उघडून. हे खाते उघडण्याची प्रक्रिया इतर बचत खात्यांप्रमाणेच असली तरी या खात्याला मिळणाऱ्या सोई आणि सुविधा सामान्य खात्यांपेक्षा वेगळ्या आहेत. अर्थात हे खाते लहान मुलांकडून हाताळले जाणार असल्याने काही चुका होण्याची शक्यता असते म्हणूनच बँकांनी काही मर्यादा घालून दिल्या आहेत. हे खाते उघडण्यापूर्वी पालकांनी त्या वैशिष्ट्यांकडे लक्ष दिले पाहिजे.