म्युच्युअल फंड क्या है? – भाग १

Reading Time: 4 minutesशेअर घेऊ की रोखे की कमोडीटी घेऊ याचा गुंतवणूकदाराने विचार करण्यापेक्षा पात्रताधारक फंड व्यवस्थापक गोळा झालेल्या रकमेचे नियोजन करत असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक किमान १,००० रुपयांपासून तर मासिक गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरु करू शकतो. काही फंड घराणी मासिक १०० रुपयांपासून देखील गुंतवणूकीची सुविधा देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रोकड सुलभ असून गरज पडल्यास विना थांबा तुम्ही काढू शकता. म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त इतर गुंतवणूक साधनांमधे एकल जोखीम – एकल परतावा असे धोरण दिसून येते.

हिंदू अविभक्त कुटुंबाला (HUF) मिळणारे करलाभ

Reading Time: 4 minutesहिंदू अविभाज्य कुटुंब हे व्यक्ती पेक्षा वेगळे आहे हे मान्य करण्यात आले. पुढे सन १९६१ मध्ये आलेल्या आयकर कायद्याने त्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्याला व्यक्तिप्रमाणे सोई सवलती देण्याचे ठरवले. याचा फायदा अनेक लोक स्वतःचे हिंदू अविभक्त कुटुंब निर्माण करून आपली एकंदर करदेयता कमी करीत आहेत. यासाठी यातील कर्त्याला स्वताचे आणि ‘एचयुएफ’चे (HUF) असे वेगवेगळे विवरणपत्र (ITR) भरावे लागते.

म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती

Reading Time: 2 minutesआपण अजूनही ठराविक व्याज देणाऱ्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करता का?  मग थांबा हे वाचा, जरा विचार करा आणि म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार हे चुकीचे आहे. म्युच्युअल फंड मध्ये तब्बल ३६ प्रकारच्या योजना असतात. त्यातील १६ योजना शेयर बाजाराशी अजिबात संबंधित नसतात. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य म्युच्युअल फंड योजना निवडा.आपली संपत्ती पुढील ३० वर्षात ३० पट बनवण्यासाठी आपली गुंतवणूक फक्त १२% चक्रवाढ व्याजाने वाढीची आवश्यकता आहे. हे शक्य होऊ शकते म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून.