गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील प्रगल्भ विश्वास
Reading Time: 3 minutes मार्च महिन्यातल्या कोरोनाच्या आघाताने शेअर बाजार अगदी ३५% कोसळला तरी ही मार्च २०२० मधील समभाग योजनांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत राहिला. विशेष म्हणजे मार्च महिन्यातील शेवटचे ९ दिवस टाळेबंदी मध्ये गेल्यानंतर ही हा गुंतवणुकीचा ओघ, त्यांचा म्युच्युअल फंड वरील प्रगल्भ विश्वास दर्शवितो. गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यातील शेवटच्या ९ दिवसात ऑनलाईन गुंतवणूक पद्धती अवलंबून पडत्या बाजारात जास्त युनिट्स मिळवण्यासाठी समभाग योजनांमध्ये गुंतवणूक केली.
सरकारी अल्प बचत योजनांचे दर १% पेक्षा अधिक खाली
Reading Time: 5 minutes कोविड-१९ आपत्तीचा सामना करण्याकरिता सरकारने आर्थिक उपाय योजना जाहीर केल्या, त्याच बरोबर आरबीआयने रेपो व्याज दर खाली आणून ४.४०% पातळीवर आणले. ह्याचा उद्देश एकच की बँकांना आणि व्यवसायांना आवश्यक निधी स्वस्तात उपलब्ध व्हावा जेणे करून आपत्तीच्या काळात त्यांच्याकडे आवश्यक तरलता राहील. आरबीआयने आपले रेपो व्याज दर कमी केल्यावर आता बँकाही आपले टर्म डिपॉजिटचे दर कमी करतील त्याच बरोबर ज्यांनी गृहकर्ज घेतले असेल त्यांचे व्याज ही कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल. मात्र जे गुतंवणूकदार आतापर्यंत फक्त जोखीम नसलेल्या बँकेच्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करीत आले त्यांना आता गुंतवणुकीचे दुसरे पर्याय पाहावे लागतील.
कोरोना – अस्थिर शेअर बाजारात आपली एस.आय.पी सशक्त कशी कराल?
Reading Time: 3 minutes एस.आय.पी मार्फत गुंतवणूक केल्यास आपण जोखीम कमी करू शकतो. मात्र त्या जोडीला चांगला परतावा मिळविण्यासाठी आणखी काय करता येईल ते आपण पाहू. एस.आय.पी मार्फत म्युच्युअल फंडात जोडल्या गेलेल्या नवनवीन गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाबद्दल विश्वास आणखी कसा वाढेल, हा या लेखामागचा उद्देश.
कोरोना, शेअर बाजार आणि एसडब्लूपी गुंतवणूक
Reading Time: 4 minutes साधारण गेल्या ४-५ वर्षांपासून, जेव्हा बँकांचे व्याजदर घसरणीला लागल्यापासून, बऱ्याचशा जेष्ठ नागरिकांनी आपली सेवानिवृत्तीनंतरची मोठी रक्कम म्युच्युअल फंडाच्या इक्विटी हायब्रीड फंडात गुंतवण्यास सुरवात केली. ह्या कॅटेगरीचे त्या वेळचे आकर्षण म्हणजे दर महिन्याला नियमित दिला जाणारा करमुक्त लाभांश. सध्या कोसळलेल्या शेअर बाजारामुळे आपल्या गुंतवणुकीतील घट पाहून आपल्याला चिंता किंवा भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे, मात्र आपली ही भीती किंवा चिंता दूर करून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतला आपला विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी काही माहिती देतो.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २० (अंतिम भाग)
Reading Time: 2 minutes ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदराच्या आजच्या अंतिम भागात आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाच्या फॅक्टशीट” विषयी. फॅक्टशीट म्हणजे एक रिपोर्ट असतो जो प्रत्येक म्युच्युअल फंड दर महिन्याला प्रकाशित करतात. यामध्ये आदल्या महिन्यात झालेल्या कर्जरोखे आणि समभागबाजारातील बदलाचा आढावा दिलेला असतो. जिथे फंड मॅनेजर आपल्याला विदेशी तसेच भारतातील घडामोडींचे विश्लेषण करून त्याचा नजीकच्या काळात म्युच्युअल फंडावर काय परिणाम होईल त्याबद्दल माहिती देतो.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १९
Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, फंड मॅनेजमेंट शैली विषयी. चांगला फंड कसा निवडायचा हे आपण बऱ्याच वेळा फंडाची पूर्वीची कामगिरी पाहून ठरवतो. परंतु तो पुढेही तितकाच चांगला परतावा देईल हे खात्रीने नाही सांगता येत, अशावेळी काहीवेळा आपण त्याची सातत्यता किंवा कॉन्सिस्टंसी पाहतो. तसेच बाजाराच्या उताराच्या काळात फंड मॅनेजर ने कसा परतावा दिला आहे ते पाहतो.