Shiv Nadar: शिव नाडार यांच्या यशाचा थक्क करणारा प्रवास

Reading Time: 3 minutes शिव नाडार (Shiv Nadar) हे नाव गेल्या काही दिवसात चर्चेत येण्याचं मुख्य कारण म्हणजे नाडार यांनी दिलेला एमडी पदाचा राजीनामा.  काही दिवसांपूर्वीच त्यांना भारतातील तिसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आलं. भारतात मागच्या काही वर्षात झालेली ‘आयटी क्रांती’ ही खरोखरच कौतुकास्पद आहे. यामध्ये ग्राहकांना माफक दरात लॅपटॉप पुरवण्यात ‘हिंदुस्थान कम्प्युटर लिमिटेड (HCL)’ या भारतीय कंपनीचा सिंहाचा वाटा आहे.